शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी भागात शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:06 IST

वर्गात गोंधळ घालण्याच्या कारणावरून शिक्षकाने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत त्याच्या वडिलांना सांगितले. शाळा प्रशासन त्या शिक्षकावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने शेवटी प्रकरण पोलिसात पोहोचले. ही घटना बुटीबोरी परिसरातील ठाणा (पादरी) (ता. उमरेड) येथील डिवाईन्स प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देखासगी शाळेतील प्रकार : शिक्षकाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्गात गोंधळ घालण्याच्या कारणावरून शिक्षकाने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत त्याच्या वडिलांना सांगितले. शाळा प्रशासन त्या शिक्षकावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने शेवटी प्रकरण पोलिसात पोहोचले. ही घटना बुटीबोरी परिसरातील ठाणा (पादरी) (ता. उमरेड) येथील डिवाईन्स प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.पी. सब्सटेन असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. ता. ठाणा (पादरी) येथील प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये शिक्षकपदी कार्यरत आहे. त्याने गुरुवारी सकाळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावरील गवत काढायला लावले होते. सदर काम आटोपल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले. वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी मस्ती करायला सुरुवात केली. त्यातच पी. सब्सटेन वर्गात दाखल झाला. त्याने विद्यार्थ्यांना गोंधळ का घालता, अशी विचारणा करीत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.पी. सब्सटेन याने सातव्या वर्गातील तब्बल १८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पार्श्वभागावर लोखंडी स्केलपट्टीने मारहाण केली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना बसणे अवघड झाले होते. यातील सुधांशू बाळकृष्ण ठाकरे (१२, रा. जुनीवस्ती, बुटीबोरी) याने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. बाळकृष्ण ठाकरे यांनी याबाबत शाळेत विचारणा केली. शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार गांभीर्याने न घेतल्याने शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सुधांशूची वैद्यकीय तपासणी करून शिक्षकाच्या विरोधात तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. त्याला शुक्रवारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र, वृत्त लिहिस्तो सदर शिक्षक ठाण्यात हजर झाला नव्हता.म्हणे ही ‘पनिशमेन्ट’ आहेपी. सब्सटेन हा विद्यार्थी व विद्यार्थिनींना नेहमीच अशा प्रकारची मारहाण करतो. हा प्रकार पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास अनेकदा आणून दिला. मात्र, पी. सब्सटेन याला समज देऊनही त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. ही विद्यार्थ्यांना ‘पनिशमेन्ट’ असल्याचे शाळेमार्फत प्रत्येकवेळी पालकांना सांगण्यात आले. हा प्रकार मान्य नसल्याने पाल्यांना दुसºया शाळेत टाकण्याच्या सूचनाही शाळा व्यवस्थापनाने काही पालकांना दिल्या आहेत. या गंभीर प्रकाराबाबत शिक्षण विभाग संबंधित शाळेवर कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी