शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

असर'च्या माध्यमातून जि. प. शाळा टार्गेट असल्याचा शिक्षकांचा आरोप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:10 IST

प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप : शैक्षणिक साहित्य, विक्रीचा 'प्रथम'चा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांना टार्गेट केले जात आहे. शाळांच्या दर्जाबाबत समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून व शिक्षकांची अवहेलना होईल अशी मांडणी 'असर' या अहवालातून प्रथम संस्थेकडून केली जात आहे. त्यामाध्यमातून शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी मारण्याचा प्रथम संस्थेचा डाव असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संपादणुकीचे सर्वेक्षण असरदार व्हायचे असेल तर पुढील वर्षापासून शिक्षकांनाही सोबत घेऊन गुणवत्तेची पडताळणी करावी. शहरातील शाळांचेही सर्वेक्षण करावे, अशी भूमिका शिक्षण समितीने मांडली आहे.

सर्वेक्षण वास्तवदर्शी'प्रथम'चे कार्यकर्ते कोणत्याही शाळेत जात नाहीत. ते गावात पारावर, मैदानावर, रस्त्यावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून शैक्षणिक गुणवत्तेची पडताळणी करतात. त्यामुळे हे तथाकथित सर्वेक्षण वास्तवदर्शी, वस्तुनिष्ठ व पारदर्शक नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केला आहे.

असर'वर संघटनेचे कोणते आक्षेप

  • सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील शाळा-शिक्षकांची बदनामी
  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताविषयक प्रगतीची योग्य दखल नाही.
  • सरकारी शाळांविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न
  • गुणवत्तेत सतत घसरण आणि कधीकधी किंचित वाढ दाखवून संस्थानिर्मित शैक्षणिक साहित्य सरकारी शाळेत पुरविण्यासाठी सर्वे
  • सरकारचे पाठबळ नसतानाही गुणवत्तेचा आलेख उंचावलेला
  • अनेक सरकारी प्राथमिक शाळेत एकच शिक्षक, मुख्याध्यापकांवर शिक्षणाबरोबरच प्रशासकीय ताणाचा उल्लेख नाही.
  • भौतिक सुविधांची वानवा, ऑनलाइन-ऑफलाइन अशैक्षणिक कामांमुळे प्रभावित अध्यापनावर सर्वेक्षणात भाष्य नाही.

"शासकीय यंत्रणेमार्फत राबविणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून जि. प. च्या विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारत आहे. दुसरीकडे नकारात्मक असर अहवाल प्रथम संस्थेकडून सादर केला जातो. ही प्रक्रियाच संशयास्पद आहे."- लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, म. रा. प्रा. शिक्षक समिती

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षणnagpurनागपूर