शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दर्जेदार अभिनयाने सजलेले ‘ते दोन दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:31 IST

महावितरणच्या प्रादेशिकस्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागपूर परिमंडळातर्फे ‘ते दोन दिवस’ तर गोंदिया परिमंडळातर्फे ‘वादळ वेणा’ हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनामुळे या दोन्ही नाट्यप्रयोगांनी रसिकांना सतत खिळवून ठेवले.

ठळक मुद्देनागपुरात महावितरणची आंतरपरिमंडळीय नाट्य स्पर्धा

लोेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या प्रादेशिकस्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागपूर परिमंडळातर्फे ‘ते दोन दिवस’ तर गोंदिया परिमंडळातर्फे ‘वादळ वेणा’ हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनामुळे या दोन्ही नाट्यप्रयोगांनी रसिकांना सतत खिळवून ठेवले.आजच्या आधुनिक परिस्थितीत एखादा मुलगा आपल्या वडिलांना प्रश्न करतो की, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय?, हा प्रश्न सरळ आणि सहज वाटत असला तरी त्याचे उत्तर म्हणजे देवेंद्र बेलनकर लिखित ‘ते दोन दिवस’, या नाटकात आई-बाबा यांनी जगलेले ते दोन दिवस. नागपूर शहराच्या  पार्श्वभूमीवर असलेल्या या नाटकात आई आणि बाबा, १२ व्या वर्गात शिकणारी त्यांची मुलगी रागिणी, इंजिनियरिंगला असलेला राहुल आणि आठवीत असलेला लहान मुलगा बबड्या. आयुष्यात प्रसिद्ध क्रि केटपटू होण्याचे बबड्याचे स्वप्न; पण नियतीला ते मान्य नसतं. बबड्याला ब्रेन ट्यूमरचा दुर्धर आजार होतो. रागिणीच्या बारावीची अंतिम परीक्षा असतानाच बबड्याचे रुग्णालयात निधन होतं. त्याच्या निधनाचे वृत्त रागिणी आणि राहुल यांना अजिबात कळू नये, त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी आई आणि बाबा पुढचे दोन दिवस पूर्ण काळजी घेत असतात. आपल्या भावनांना आवर घालीत दोन दिवस जगलेले आई-बाबा. एकीकडे आपल्या मुलांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून धडपडणारे आई-बाबा तर दुसरीकडे आपल्या लहान भावाच्या निधनाची माहिती दडवून ठेवल्याबद्दल मुलांच्या मनातील आई-बाबा यांच्याविषयी असलेला राग. मानवी नात्यातील असलेली गुंतागुंत भक्कमपणे आपल्या अभिनयातून साकार करणारे अभय अंजीकर, दीपाली घोंगे, जयंत बानेरकर, प्रणाली डेकाटे, श्रीरंग दहासहस्र आणि अविनाश लोखंडे. या नाटकाला स्ींगीत जयेश कांबळे यांचे, नेपथ्य केशवानंद सूरकार, प्रकाशयोजना सूरज गणवीर, रंगभूषा प्रीतीबाला चौहान तर वेशभूषा अनुजा पात्रीकर यांची होती. अभय अंजीकर यांच्या समर्थ दिग्दर्शनात महावितरणच्या नागपूर परिमंडळातर्फे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.गोंदिया परिमंडळातर्फे श्रीपाद जोशी लिखित ‘वादळ वेणा’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाटकात मानवतावादी विचाराविरोधात विद्रोही विचारांचा संघर्ष दाखिवण्यात आला आहे. गावातील एका विहिरीवर आत्महत्या करण्याऱ्या विद्रोही कवीला बाबा परावृत्त करतात. यावेळी बाबा आणि कवी सुमंत यांच्यातील वैचारिक संघर्ष लेखकाने अतिशय प्रभावीपणे सादर केला आहे. अखेर विद्रोही विचारावर मानवतावादी विचार मात करतात, असे नाटकाच्या अखेरीस दाखविले आहे. या नाटकात राजेश नाईक, अरु ण देशमुख, सुधाकर सोनटक्के, शुभांगी मेश्राम, एकनाथ ढवळे, नीरज मातीखाये, मनीष बढे आणि रणजित पानतावणे यांच्या भूमिका आहेत. राजेश नाईक यांच्या प्रभावी दिग्दर्शनात सादर करण्यात आलेल्या या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली

टॅग्स :cultureसांस्कृतिकmahavitaranमहावितरण