टॅक्सीचालकाला जबलपूरला नेऊन लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST2021-09-24T04:08:57+5:302021-09-24T04:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जबलपूरला जाण्यासाठी टॅक्सी करून दोन भामट्यांनी कारचालकाला एका ढाब्यावर नेले. तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध ...

The taxi driver was taken to Jabalpur and robbed | टॅक्सीचालकाला जबलपूरला नेऊन लुटले

टॅक्सीचालकाला जबलपूरला नेऊन लुटले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - जबलपूरला जाण्यासाठी टॅक्सी करून दोन भामट्यांनी कारचालकाला एका ढाब्यावर नेले. तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर टॅक्सीचालकाच्या जवळचे सात हजार रुपये, मोबाईल आणि महत्त्वाच्या चीजवस्तू लंपास केल्या. १४ जुलैला जबलपूरजवळ घडलेल्या या घटनेप्रकरणी अमर रमेश ठाकूर (वय ३२, रा. मानेवाडा) यांची तक्रार नोंदवून घेत, बुधवारी गणेशपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

झुल्फिकार हबीब सैफी (वय ३३, रा. गोरखपूर) अशी ओळख देणाऱ्या आरोपीने त्याच्या एका साथीदारासह १३ जुलैला सकाळी १०.१५ वाजता ठाकूर यांची स्विफ्ट कार जबलपूरला जाण्यासाठी बुक केली. त्यानुसार ठाकूर या दोघांना घेऊन जबलपूरकडे निघाले. जबलपूरपासून ३५ किलोमीटर आधी प्रभुराज ढाब्यावर आरोपींनी नाश्ता करायचा आहे, असे सांगून ठाकूर यांना कार थांबविण्यास सांगितले. तेथे संधी साधून ठाकूर यांना शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. ते पिल्यानंतर ठाकूर बेशुद्ध झाल्याचे पाहून आरोपींनी त्यांच्या जवळचे रोख ७ हजार रुपये, मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ६० हजाराचा ऐवज घेऊन पळ काढला.

----

अडीच महिने चाैकशी, तपास नागपूरला सोपविला

शुद्धीवर आल्यानंतर ठाकूर यांनी जबलपूर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तब्बल अडीच महिने तपास केल्यानंतर शून्य क्राईमीनुसार, हा गुन्हा गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरू झाल्याचे निष्कर्ष काढून, तो पुढील चाैकशीसाठी नागपूरला पाठविला. त्यावरून गणेशपेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: The taxi driver was taken to Jabalpur and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.