शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नागपुरात  टॅक्स वसुलीला फटका पण नगररचनाने तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 10:05 PM

महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या टॅक्स व पाणीपट्टी वसुलीला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे टॅक्स वसुली २४० कोटीवर थांबली : नगररचना १९६ कोटी तर पाणीपट्टीची १४० कोटींची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या टॅक्स व पाणीपट्टी वसुलीला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. मालमत्ता करापासून मार्च अखेरीस २६० ते २७० कोटींची वसुली अपेक्षित होती. त्यानुसार विभाग कामाला लागला होता. परंतु मागील १५ दिवसात टॅक्स वसुली मोहीम राबविता न आल्याने वसुली २४० कोटीं पर्यंतच पोहचली आहे. पाणीपट्टीचे १६० कोटींचे उद्दिष्ट असताना १४० कोटींची वसुली झाली. मात्र नगररचना विभागाने तारले आहे. ९३.२७ कोटींचे उद्दिष्ट असताना वसुली १९५.६८ कोटी झाली आहे. यामुळे आर्थिक संकटातील मनपाला थोडा दिलासा मिळाला आहे.आयुक्तांनी सुधारित अर्थसंकल्पात वसुलीसाठी विविध विभागांना उद्दिष्ट दिले होते. दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा होती. मात्र कोरोनाचे संकट डोक्यावर असल्याने कोरोनापासून सुटका हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामी लागली. एरवी मार्च एण्डिंगला सर्व अधिकारी वसुलीच्या कामी लागतात. विशेष पथकही बनविले जाते. मात्र गेल्या १५ दिवसात कोरोनामुळे वसुलीची प्रक्रिया जवळजवळ ठप्प होती. स्थायी समितीने वर्ष २०१९-२० चा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. परंतु उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात उत्पन्न २२५५.०९ कोटी तर खर्च २६९८.३५ अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्तीचे आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली होती. मात्र कोरोनामुळे ही यंत्रणा उपाययोजनांच्या कामाला लागली.३१ मार्च अखेरीस प्रमुख विभागाची उत्पन्नाची आकडेवारी मिळाली आहे. परंतु शासकीय अनुदान व शासकीय विभागांकडील देणी व येणे याचे समायोजन विचारात घेता वित्त वर्षात महापालिकेच्या तिजोरीत नेमका किती महसूल जमा झाला याबाबतची स्थिती स्पष्ट होण्याला तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मालमत्ता करानंतर महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या नगररचना विभागाकडून ९४.९१ कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९५.६८ कोटींचा महसूल जमा झाला. नासुप्रचे शहरातील अधिकार काढल्याने मनपाचा महसूल वाढला आहे. बाजार विभागाला १४४.५१ कोटींचे उद्दिष्ट असताना मार्च अखेरीस ११.६० कोटीचा महसूल जमा झाला. लोककर्म बीओटी प्रकल्पातून ३५ कोटी तर विद्युत विभागामुळे ३०.७५ कोटी मिळण्याची आशा होती. परंतु या विभागांना उद्दिष्ट गाठता आले नाही.मनपाच्या प्रमुख विभागाचे उत्पन्न (कोटी)मालमत्ता -२४०नगररचना - १९५.६८पाणीपट्टी- १४० बाजार -११.६०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर