तथागत बुद्धांचा विचार प्रेरक

By Admin | Updated: November 7, 2014 00:41 IST2014-11-07T00:41:40+5:302014-11-07T00:41:40+5:30

जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती संपवायची असेल तर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याशिवाय पर्याय नाही. जातीयवादी आणि धर्मांधतेचे युद्ध जगात सुरू आहे.

Tathagata Buddha's thoughts motivator | तथागत बुद्धांचा विचार प्रेरक

तथागत बुद्धांचा विचार प्रेरक

भदंत कानसेन मोचिदा : ड्रॅगन पॅलेस टेम्पल वर्धापनदिन
कामठी : जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती संपवायची असेल तर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याशिवाय पर्याय नाही. जातीयवादी आणि धर्मांधतेचे युद्ध जगात सुरू आहे. त्यामुळे अनेक देशांची स्थिती हलाखीची झाली आहे. त्यातून वाचण्यासाठी बुद्धधम्म हाच पर्याय आहे, असे मत आंतरराष्ट्रीय निचिरेन-शु फेलोशिप असोसिएशन जपानचे अध्यक्ष भदंत कानसेन मोचिदा यांनी व्यक्त केले.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर दादासाहेब कुंभारे परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भदंत इशी वातानाबे, भदंत जिकेई मत्सुमोटो, भदंत होनवो ओक्युनो, भदंत इको नाकायमिया, भदंत इशुन कावासाकी, भदंत कइजु शिबाटा, भदंत गिकयो वातानाबे, भदंत शिनग्यो ईमाई, भदंत झेनशेई निबे, भदंत केताई कोयझुमी, भदंत कोयु मोत्सुमोरी, भंदत चिडो युचीयामा, भदंत शुनको योशिनो, भदंत क्योशो फुजीइ, भदंत बिशो नागाशे यांच्यासह कामठीचे आ. चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे आ. मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्षा रिजवाना कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बुद्धधम्म हा मनाचे सर्जन करणारा आहे. वैयक्तिक आणि आंतरिक सुखप्राप्तीसाठी तथागतांचा धम्माशिवाय दुसरा कोणताच पर्याय होऊ शकत नाही, असेही मोचिदा यांनी स्पष्ट केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी जपानचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जपानमधील महत्त्वपूर्ण कार्याची पाहणी केली. जपानमधील प्रगती पाहून ते भारावले, असा उल्लेख करीत अशी प्रगती भारतात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकातून ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून धम्माचा प्रसार आणि प्रचार होत असल्याचे सांगितले. तथागतांच्या धम्मात अंधश्रद्धेला स्थान नाही. तो विचार व्यापक होणे आवश्यक असून, तो व्यावहारिक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दुर्योधन व त्यांच्या चमूंनी ‘घबराये जब मन अनमोल...’ हे गीत सादर करीत उपस्थितांचा प्रतिसाद मिळविला. हरदास शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतपर स्वागतगीत सादर केले. संचालन सुलभा शिरसाट यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पंचशील तत्त्वातून राज्याची प्रगती व्हावी - मुख्यमंत्री
ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे विश्व शांतीचे प्रतीक असून येथे मनाला शांतता मिळते, असे सांगत पंचशील तत्त्वातून महाराष्ट्र राज्याची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रॅगन पॅलेस येथील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत, त्यांनी ही प्रार्थना केली. वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी रात्री त्यांनी भेट दिली. संस्थापिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. डी. एम. रेड्डी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, उपाध्यक्ष रणजित सफेलकर, नगरसेवक अजय कदम, नियाज कुरेशी, रजनी लिंगायत, मोरेश्वर पाटील, अविनाश उकेश, दीपक सिरिया, अशफाक कुरेशी, गुड्डू मानवटकर, विवेक मंगतानी, डॉ. संदीप कश्यप, कपिल गायधने, शांता गायधने, हेमंत गोरखा आदी उपस्थित होते.

Web Title: Tathagata Buddha's thoughts motivator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.