नागपुरात लक्ष्य विकासाचे, मात्र निधीची वानवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:12 IST2019-08-19T11:10:47+5:302019-08-19T11:12:02+5:30
नागपूर स्थायी समितीचाही विकासाचा मानस आहे. पण तिजोरीत निधीची वानवा असल्याने महापालिक ा प्रशासनाकडून फाईल मंजुरीला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे.

नागपुरात लक्ष्य विकासाचे, मात्र निधीची वानवा!
गणेश हुड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तीन महिने विकास कामांना बे्रक लागला होता. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी २६ जूनला ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. जुलै महिन्यात अर्थसंकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. यात पुन्हा अडीच-तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. तत्पूर्वी फाईल मंजूर व्हाव्यात यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. स्थायी समितीचाही विकासाचा मानस आहे. पण तिजोरीत निधीची वानवा असल्याने महापालिक ा प्रशासनाकडून फाईल मंजुरीला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे.
शहरातील विकास कामांना गती मिळण्यासाठी रस्ते, सिवर लाईन, गडर लाईन, संरक्षण भिंत व प्रभागातील विकास कामांच्या फाईल सादर करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकात्मिक रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत दुसºया व तिसºया टप्प्यातील शिल्लक सिमेंड रोडसाठी २०० कोटी तर प्रस्तावित सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखड्यानुसार डीपी रोडसाठी १५ कोटी, शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे व डांबरीकरण यासाठी २५.५५ कोटींची तरतूद आहे. परंतु महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता, स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही यातील फारतर ५० टक्के फाईल्स मंजूर होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नासुप्र बरखास्त झाली आहे. त्यामुळे महापालिकेला ५७२ व १९०० अभिन्यासातील विकास कामे करावी लागतील. यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु ती पुरेशी नाही. शहरातील पथदिव्यांसाठी ६५ कोटी, प्रभागातील विकास कामांसाठी ३२.७६ कोटी, खेडे विभागाच्या सुधारणासाठी २० कोटी, शहरातील सोनेगाव, नाईक तलाव व गांधीसागर तलावांच्या विकासासाठी ३२.३२ कोटी, श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन सभागृह टाऊ न हॉल व कविवर्य सुरेश भट संगीत, साहित्य कला अकादमीसाठी १४ कोटी, यंत्रसामुग्री खरेदी १० कोटी, भाजी मार्केट व मच्छी मार्के टसाठी १८ कोटी, शहरातील रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविण्यासाठी ६७ कोटी, मॉडेल सोलर सिटीसाठी २५ कोटींची तरतूद आहे.
नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी ६० कोटी, आॅरेंज सिटी स्ट्रीट आणि मेट्रो मॉलसाठी ६० कोटींची तरतूद केली आहे. बुधवार बाजार महाल, सक्करदरा विकासासाठी २५ कोटींची तरतूद आहे. परंतु उपलब्ध निधीनुसार प्रशासनाकडून या विकास कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंजूर फाईलपैकी अर्ध्याहून अधिक प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.
नासुप्र बरखास्तीमुळे दायित्व वाढले
शहरातील विकास प्रकल्पात नासुप्रचा मोठा वाटा आहे. परंतु आता नासुप्र बरखास्त झाल्याने हा वाटा महापालिके ला उचलावा लागणार आहे. सिमेंट रोड, स्मार्ट सिटी व मेट्रो रेल्वे प्रकल्पातील नासुप्रचा वाटा महापालिकेला उचलावयाचा आहे. १९०० व ५७२ ले-आऊ टमधील विकास कामांची जबाबदारी आल्याने महापालिकेला यावर मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. यासाठी जवळपास ७०० ते ८०० कोटी खर्च करावे लागतील.