विदर्भात साजरा होणारा तान्हा पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 15:23 IST2017-08-22T15:22:06+5:302017-08-22T15:23:45+5:30
पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तर त्यांनी काय करावे? कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्यही होणार नसते. म्हणून विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ््याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.

विदर्भात साजरा होणारा तान्हा पोळा
आॅनलाईन लोकमत
नागपूर-पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तर त्यांनी काय करावे? कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्यही होणार नसते. म्हणून विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ््याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलाला रंगवणे, तोरण, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे याची जणू होडच लागते.
असा बैल संध्याकाळच्या वेळी परिचितांकडे नेऊन पोळा मागितला जातो. मग त्या बैलाला व बैलधारकाला ते परिचित कुटुंब खाऊ व थोडेसे पैसे देतात. या लाकडी बैलांचा मेळावाही मग एका ठिकाणी सुरू होतो. त्यांच्या सजावटीवर बक्षिसे जाहीर केली जातात.