ग्राहक सेवेसाठी ‘टेकॉप्स’ कटिबद्ध
By Admin | Updated: February 13, 2016 02:52 IST2016-02-13T02:52:28+5:302016-02-13T02:52:28+5:30
उमरेड रोड आता ‘टेकॉप्स’ नावाने ओळखला जातो. फारच कमी कालावधीत जवळपास २५०० ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरं ..

ग्राहक सेवेसाठी ‘टेकॉप्स’ कटिबद्ध
‘आयएसओ’ कंपनीचे २५०० संतुष्ट ग्राहक :आधुनिक सोयीसुविधा, गुणवत्तापूर्ण बांधकाम
नागपूर : उमरेड रोड आता ‘टेकॉप्स’ नावाने ओळखला जातो. फारच कमी कालावधीत जवळपास २५०० ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरं उपलब्ध करून देत कंपनीने बांधकाम क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली. बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ओळखली जाते. ग्राहक संतुष्टीवर कंपनीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.
विलास हरडे, राजेंद्र नाकाडे, जीवन घिमे, नरेन डाखळे, अनिल काळे हे कंपनीचे पाच संचालक आहेत. लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, कंपनीची स्थापना २००८ मध्ये झाली. गुणवत्तापूर्ण बांधकाम, पारदर्शक व्यवहार, वेळेत घरांचा ताबा या त्रिसूत्रीने कंपनीने कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. दरवेळी नवनवीन देण्याचा प्रयत्न तर ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि हवे असलेले दर्जेदार बांधकाम देण्यावर कंपनीचा भर आहे. सहापैकी कोराडी व कळमन्यात एक-एक तर उमरेड रोडवर चार प्रकल्प उभारले आहेत. सर्व प्रकल्प एनआयटी मेट्रो रिजनअंतर्गत मान्यताप्राप्त आहेत.
आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण टेकॉप्स गार्डन या आधुनिक मिनी टाऊनशिपमध्ये यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई शाळा सुरू होणार आहे. गुणवत्तापूर्ण बांधकामासह आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचा विश्वास संचालकांनी व्यक्त केला.
कंपनीचे प्रकल्प
आयएसओ कंपनी
२५०० संतुष्ट ग्राहक़
गुणवत्तापूर्ण बांधकाम, पारदर्शक व्यवहार, वेळेत घरांचा ताबा.
टेकॉप्स लक्ष्मी, कोराडी रोड, ८२ फ्लॅट.
टेकॉप्स सिटी, उमरेड रोड, १२ एकर, १०४ बंगले व १८० फ्लॅट.
टेकॉप्स गार्डन, उमरेड रोड, १२ एकर, १७५ बंगले व ७५ फ्लॅट.
टेकॉप्स ग्लोरी, उमरेड रोड, १२ हजार चौरस फूट व्यावसायिक बांधकाम व ३ बीएचके फ्लॅट
टेकॉप्स पार्क, कळमना, ४६ एकर, प्लॉट, फ्लॅट व दुकान.
टेकॉप्स कोर्ट, उमरेड रोड (शहर), १.२५ एकर, २५ हजार चौरस फूट व्यावसायिक जागा व १०३ फ्लॅट.