शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

तोट्यातील वेकोलिला विशेष मोहिमेद्वारे बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:49 IST

पाच वर्षांपासून कोट्यवधींच्या तोट्यातील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडला बाहेर काढण्यासाठी ‘मिशन : डब्ल्यूसीएल २.०’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात वेकोलिच्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी केले आहे. त्यामुळे कोळशाचे उत्पादन व विक्री वाढून तोटा भरून निघेल, असा विश्वास वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजीव रंजन मिश्र यांचा विश्वास : ५२.५ दशलक्ष टन उत्पादनाचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच वर्षांपासून कोट्यवधींच्या तोट्यातील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडला बाहेर काढण्यासाठी ‘मिशन : डब्ल्यूसीएल २.०’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात वेकोलिच्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी केले आहे. त्यामुळे कोळशाचे उत्पादन व विक्री वाढून तोटा भरून निघेल, असा विश्वास वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी व्यक्त केला.पत्रकार क्लब आॅफ नागपूरतर्फे सिव्हिल लाईन्स येथील सभागृहात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर वेकोलिचे संचालक (कार्मिक) संजयकुमार, पत्रकार क्लब आॅफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, संचालक जोसेफ राव व सरिता कौशिक उपस्थित होते.तोट्यानंतरही कंपनीचे नेटवर्थ पॉझिटिव्हमिश्र म्हणाले, २०१४-१५ मध्ये कंपनीला ५४४.७९ कोटींचा तोटा, २०१५-१६ मध्ये ३९४.२० कोटी, २०१६-१७ मध्ये १०७५.५१ कोटी आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षांत कंपनीला २८२९ कोटी २६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. तीन वर्षांत तोटा भरून काढण्याचे लक्ष्य आहे. तोटा असला तरीही कंपनीचे नेटवर्थ पॉझिटिव्ह आहे. कंपनीची मोहीम म्हणजे सिस्टिममध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत दिसून आला. पण दुसºया तिमाहीत पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला. सध्या कोळशाची मागणी वाढली आहे. वेकोलिच्या बहुतांश खाणी जमिनीखाली असल्यामुळे उत्पादनात अडचण येते. त्यानंतरही वर्ष २०१६-१७ च्या ४६.२२ दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत वर्ष २०१८-१९ मध्ये ५२.५० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले. त्यात १३.६ टक्के वाढ झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये २३.४४ टक्के वाढीसह आतापर्यंत सर्वाधिक ४८.७६ दशलक्ष टन कोळशाचे वितरण केले. वेकोलिच्या इतिहासात पहिल्यांदा दोन आकडी वाढ नोंदविल्याची माहिती मिश्र यांनी दिली.नव्याने ११ खाणी सुरू करणारकोळशाचा खोलवर साठा, निम्न श्रेणीचा कोळसा, उत्पादन गुंतवणुकीत वाढ झाल्याने तोटा झाला आहे. दोन वर्षांत कंपनीला सर्वाधिक तोटा झाला. वेकोलिकडे मोठ्या खाणी नसल्यामुळे तात्काळ तोटा भरून काढणे शक्य नाही. त्यामुळेच उत्पादन आणि वित्तीय स्थिरतेसाठी क्षमता उच्चतर स्तरावर नेण्याचा प्रयत्न आहे. वेकोलिने १९ खाणी सुरू केल्या असून, ११ नव्याने सुरू करण्यात येणार आहे. अन्य राज्यातही खाणी सुरू करण्यात येणार असल्याचे मिश्र यांनी स्पष्ट केले.रेती आणि पिण्याच्या पाण्याची विक्रीवेकोलिने कोळशा खाणीतून रेती काढणे सुरू केले आहे. हा प्रकल्प व्यावसायिकरीत्या दाखल करणार आहे. करारानुसार नासुप्र आणि पंतप्रधान आवास योजनेसाठी रेती उपलब्ध करून दिली आहे. ८ हजार क्युबिक मीटरचे लक्ष्य आहे. ७७५ रुपये क्यु. मीटर दराने निविदा काढणार आहे. रेतीला राज्याच्या सर्व भागातून मागणी आहे. याशिवाय खाणीतील पाण्याचा उपयोग सिंचन, वीजनिर्मिती प्रकल्प आणि पिण्यासाठी होत आहे. ४२ कोटी लिटर पाणी दररोज काढण्यात येत आहे. कॉलनी आणि खाणीच्या लगतच्या गावातील लोकांना पाणी नि:शुल्क देण्यात येत आहे. १० लाख बाटलीबंद बॉटल पाणी विकण्याचा व्यावसायिक उपक्रम सुरू होणार आहे. आता बॉटलचा दर केवळ ८ रुपये आहे. वेकोलिच्या ४९ कॉलनी अपग्रेड करण्यात येत आहेत. याशिवाय १ एप्रिल २०१९ पासून तीन मध्यवर्ती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे मिश्र म्हणाले.

 

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरnagpurनागपूर