काेराेना काळात चिमुकल्यांना अधिक जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:53+5:302021-04-11T04:08:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : काेराेनाचा प्रकाेप सर्वत्र वाढत असून, आता काही प्रमाणात लहान मुलेही बाधित हाेत आहेत. अशावेळी ...

काेराेना काळात चिमुकल्यांना अधिक जपा
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : काेराेनाचा प्रकाेप सर्वत्र वाढत असून, आता काही प्रमाणात लहान मुलेही बाधित हाेत आहेत. अशावेळी चिमुकल्यांची अधिक काळजी घ्या. आजारपणामुळे बाळाला स्तनपान व संगाेपनाची समस्या निर्माण हाेते. बाळाच्या आराेग्यासाठी आईचे दूध फायदेशीर असते. काेराेनाची साैम्य व मध्यम लक्षणे असलेल्या मातांनी बाळाला स्तनपान करावे, तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास दूध काढून बाळाला पाजावे, असा सल्ला बालराेग तज्ज्ञ डाॅ. अमाेल करांगळे यांनी दिला.
बरेचदा बाळांमध्ये लक्षणे नसतात. काहींना ताप, सर्दी, खाेकला, घशात खवखव वाटणे, मळमळ आदी साैम्य लक्षणे दिसून येतात. तीव्र लक्षणे फार कमी मुलांमध्ये आढळून आली आहेत. तसेच आई कोरोनाबाधित असताना बाळाला स्तनपान करावे काय, असा प्रश्न पडताे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या मातांनी बाळाला स्तनपान करावे. तीव्र स्वरूपाची लक्षणे असतील तर दूध काढून बाळास देण्यास काही हरकत नाही. स्तनपान हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मात्र, बाळाला स्तनपान करताना कोरोनाबाधित आईने काळजी घेणे गरजेचे आहे. आईने मास्क लावावा, स्तनपान करताना बाळाला आणि त्याच्या कुठल्याही वस्तूला हात लावण्याअगोदर हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा. स्तनपान करणे शक्य नसल्यास दूध काढून द्यावे.
स्तनपानातून कोरोना संसर्ग वाढतो हे सध्यातरी आढळून आले नाही, असेही डाॅ. करांगळे यांनी सांगितले. तसेच बाळाचे नियमित लसीकरण सुरू ठेवावे. मुलांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून आल्यास तसेच मुले कोरोनाबाधिताच्या जवळून संपर्कात आल्यास मुलांची कोरोना चाचणी करावी व डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत, अशी माहिती त्यांनी दिली.