शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : नागपुरात अभियंत्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 21:34 IST

आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत अभियंत्यांनी शिविगाळ, मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सभेनंतर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत अभियंत्यांनी शिविगाळ, मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सभेनंतर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. मी शेडेकर असे लिहिलेल्या टोप्या अभियंत्यांनी घातल्या. यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी अभियंत्यांनी अशा प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मुख्य अभियंता उल्हास देबडवार म्हणाले, कमी वेळात सूचना देऊनही सर्व अभियंता उपस्थित झाले ही चांगली बाब आहे. भविष्यात अशीच एकता राहिल्यास सर्वांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण होईल. कोणताही शासकीय कर्मचारी असो त्यास संरक्षण मिळणे आवश्यक असून अशा प्रसंगी सर्वांनी तुटून पडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. निषेध सभेनंतर अभियंत्यांनी कार्यालयाबाहेर येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत नारेबाजी केली. यावेळी राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्रचे अविनाश गुल्हाने, राजदत्त अलोने, मुकुल देशकर, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष संजय नंदनवार, संजय भोगे, योगेश निंबुळकर, राजेश जाजुलवार यांच्यासह अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनpwdसार्वजनिक बांधकाम विभागEmployeeकर्मचारी