दोषपूर्ण मेट्रो रिजन आराखडा मागे घ्या

By Admin | Updated: December 16, 2015 03:29 IST2015-12-16T03:29:56+5:302015-12-16T03:29:56+5:30

नागपूर सुधार प्रन्यासने नागपूरचा कोणताही विकास केला नसला तरी शासनाने नागपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील

Take back the faulty Metro Region Plan | दोषपूर्ण मेट्रो रिजन आराखडा मागे घ्या

दोषपूर्ण मेट्रो रिजन आराखडा मागे घ्या


जय जवान जय किसान संघटना

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने नागपूरचा कोणताही विकास केला नसला तरी शासनाने नागपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ७२१ गावांची विकास योजना राबविण्यासाठी नासुप्रची नियुक्ती केली. नासुप्रने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येईल, असा दोषपूर्ण विकास आराखडा तयार केला. त्यामुळे नागपूर मेट्रो रिजन विकास आराखडा मागे घ्यावा, अशी मागणी जय जवान जय किसान या संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नासुप्रच्या विरोधात मोर्चात सहभागी आंदोलकांनी, शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या.
नेतृत्व : प्रशांत पवार, सुधीर सावंत, अरुण वनकर, सुभाष बांते
मागण्या : ७२१ गावांचा विकास करण्यासाठी नासुप्रची केलेली नियुक्ती रद्द करावी
विकास आराखडा राबविताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे हक्क गोठविण्यात येऊ नये
दोषपूर्ण मेट्रोरिजन विकास आराखडा रद्द करावा
नागपूर सुधार प्रन्यास ही संस्था बरखास्त करावी
भूखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात यावे

Web Title: Take back the faulty Metro Region Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.