पाया पडण्याच्या सूचना करणाºयांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:27 IST2017-08-21T01:26:55+5:302017-08-21T01:27:08+5:30

रामटेक तालुक्यातील नगरधन येथील जागृती अनुदानित आश्रमशाळेच्या तपासणीसाठी आलेल्या अधिकाºयांनी ....

Take action on footfall notifications | पाया पडण्याच्या सूचना करणाºयांवर कारवाई करा

पाया पडण्याच्या सूचना करणाºयांवर कारवाई करा

ठळक मुद्देआदिवासी विभागातील अधिकाºयांचा निषेध : आश्रमशाळा शिक्षकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक तालुक्यातील नगरधन येथील जागृती अनुदानित आश्रमशाळेच्या तपासणीसाठी आलेल्या अधिकाºयांनी १६ आॅगस्ट २०१७ ला शिक्षकांना संस्थाचालकाच्या पाया पडण्याबाबत सूचना केल्या होत्या. अशा अधिकाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे अन्य मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.
आश्रमशाळेच्या शिक्षकांचे मे ते जुलै २०१७ चे वेतन झालेले नाही. अनुदानित आश्रमशाळा पिठोरी, ता.नरखेड येथील शिक्षकांना वेतनात वरिष्ठ श्रेणी लागू करण्यात आली नाही. अनुदानित आश्रमशाळेतील, नागपूर प्रकल्प कार्यालयात प्रलंबित वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव निकाली काढावे व वरिष्ठ श्रेणी लागू करावी, अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाºयांच्या थांबविलेल्या वेतनवाढी मोकळ्या कराव्यात, या मागण्यांसाठी शिक्षकांनी प्रकल्प कार्यालयापुढे भीख मांगो आंदोलन केले. प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी मागण्यांबाबत चर्चा केली. शाळांनी सादर केलेली बिले ट्रेझरीत पाठविलेली असल्याचे सांगितले. चार दिवसात वेतन होईल असे आश्वासन त्यांनी दिले आंदोलनात प्रमोद रेवतकर, तेजराज राजूरकर, विठ्ठल जुनघरे, जी.के.राठोड, हेमंत कोचे, एम.एन.निंबुळकर, एस.एस.सरोदे, पी.बी.तलमले, ए.टी.कन्नाके, के.एम.इटनकर, जी.व्ही.गणोरकर, एस.ए.मांडवगडे, चंद्रमणी गायकवाड, व्ही.व्ही.बोरकर, पी.डी.पटिये, डी.जे.निखाडे, दीपमाला मारोतकर, अर्चना ढगे, कांचन भुते, आशा ढगे, पुष्पा गजभिये आदी सहभागी झाले होते.

Web Title: Take action on footfall notifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.