शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कॅनमधून थंड पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:47 IST

मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.

ठळक मुद्देअ.भा.ग्राहक पंचायतची : प्रशासनाकडून तक्रारीची दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नसमारंभ व कार्यक्रमांमध्ये गावागावांत आणि शहरांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री करण्यात येत आहे. पाण्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याची मागणी पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.पाणी खरोखरच शुद्ध आहे का? हा गंभीर मुद्दा आहे. नळ्याच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता केवळ थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यूव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध करायला हवे. २० लिटर एक कॅन (प्रत्यक्षात १७ लिटर) २० ते ४० रुपयांपर्यंत विकण्यात येते. हा खेळ प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन, वैधमापनशास्त्र विभागाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. परंतु याची प्रशासन गंभीर दखल घेत नाही, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.कॅनमधून पाणी विक्री करणारे कारखाने शहरात गल्लीबोळात आहेत. त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापनशास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. थंड पाण्याच्या कॅनची प्रत्यक्षात किंमत किती? विकले जाणारे पाणी आरोग्याला फायद्याचे आहे का? विक्रीचे परवाने आहेत का? कारखान्याला परवानगी कुणी दिली, यासंदर्भात विस्तृत माहिती प्रशासनाने ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गजानन पांडे यांच्यासह प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, अशोक पात्रीकर, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, प्रांत महिला प्रमुख तृप्ती आकांत, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, श्रीपाद हरदास, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, संध्या पुनियानी, विलास ठोसर आणि इतर पदाधिकारी यांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलन