शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री सतीश चतुर्वेदींवरील कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:04 IST

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देआवारी, वनवेंसह समर्थकांचे दिल्लीत नेत्यांना साकडेशहर काँग्रेसची निवडणूक घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.चतुर्वेदी दिल्ली येथे तळ ठोकून आहेत. त्यांनीही आपल्या समर्थकांना दिल्ली येथे बोलावून घेतले. समर्थकांनी नेत्यांच्या भेटी घेत आपली बाजू मांडली. तानाजी वनवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात कुणाल राऊत, यशवंत कुंभलकर, विजय बाभरे, दीपक कापसे, नगरसेवक कमलेश चौधरी, किशोर जिचकार, परसराम मानवटकर, दिनेश यादव, पुरुषोत्तम हजारे, मनोज गावंडे, प्रणिता शहाणे, राकेश निकोसे, अरुण डवरे, आयशा अन्सारी, शादाब खान, अनिल मछले, आमीर नुरी, धीरज पांडे, राजेश जरगर, बाबा वकील, राजू पाली, विजय वनवे, बाबा घोरपडे, नीरज चौबे यांच्यासह एकूण ५५ जाणाचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले.एकीकडे पक्ष बळकट करण्यासाठी बाहेरचे लोक पक्षात घेणे सुरू आहे तर दुसरीकडे पक्षातील सक्षम नेत्यांना कट रचून बाहेर काढले जात आहे. चतुर्वेदींवरील कारवाई योग्य नाही. त्यांना परत पक्षात घेण्यात यावे, अशी बाजू या शिष्टमंडळाने मांडली. सोबत नागपूर शहरातील संघटनेच्या निवडणुका थांबल्या आहेत. निरीक्षक पाठवून निवडणूक घेण्यात यावी. शहर अध्यक्ष पक्ष विरोधी कारवाया करीत आहे. पक्षाची बदनामी करीत आहेत. त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे तानाजी वनवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर