ताजबाग रोडची गाडी मंदावली?

By Admin | Updated: April 5, 2017 02:23 IST2017-04-05T02:23:57+5:302017-04-05T02:23:57+5:30

शहर विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या सिमेंट रोडच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील ५४ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Tajbagh Road's car slowed? | ताजबाग रोडची गाडी मंदावली?

ताजबाग रोडची गाडी मंदावली?

खोदकामामुळे रहदारीला अडथळा : संथ कामाने वाहनधारक त्रस्त
नागपूर : शहर विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या सिमेंट रोडच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील ५४ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी यातील अनेक कामांना एकाच वेळी सुरुवात करण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत कामे पूर्ण व्हावी यासाठी २२ पॅकेजमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली. सुरुवातीला कामाचा धडाका बघता एक-दोन महिन्यात सिमेंट रोडची कामे पूर्ण होतील, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु निवडणुका संपताच कामे ठप्प पडली. यात छोटा ताजबाग टी पॉर्इंट ते भांडेप्लाट चौक ते गुरुदेव नगर सिमेंट रोडचाही समावेश आहे.
अजनीकडून उमरेडकडे या मार्गाचा वापर करतात. तसेच सक्करदरा ते उदयनगर रिंगरोड, म्हाळगीनगर, मानेवाडा भागात जाणारे याच मार्गाने जातात. परंतु सिमेंट रोडचे काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या रोडच्या बाजूलाचा सक्करदरा तलाव व बाजूलाच नासुप्रचा बगिचा आहे. तसेच बॉलिवूड सेंटर पॉर्इंट हॉटेल आहे. सायंकाळी या ठिकाणी येणाऱ्यांची गर्दी असते. परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे.
रोडच्या एका बाजूने खोदकाम केले असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी छोटा ताजबाग दर्ग्याकडे जाणाऱ्या गेटजवळ खोदकाम करण्यात आले आहे. सक्करदरा, अजनी व उमरेड रोडला जोडणारा हा टी- पॉर्इंट असल्याने या रोडवर वाहनांची सतत वर्दळ असते. सिमेंट रोडच्या कामामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पार्किगची समस्या आहे. बॉलिवूड सेंटर पॉईटच्या बाजूला कामगारांचा ठिय्या आहे. दररोज सकाळी ११ पर्यत येथे कामगारांची गर्दी असते. रोडच्या एकाच बाजूने ये-जा सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होते. (प्रतिनिधी)

फूटपाथकडे दुर्लक्ष
प्रशस्त व चालण्यासाठी सोईचे फूटपाथ निर्माण केले तर पादचाऱ्यांना त्यावरून चालणे शक्य होईल. भविष्यात सिमेंट रोडवरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार नाही. परंतु येथील फूटपाथवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. तसेच निकषानुसार फूटपाथ निर्माण करण्यात आलेले नाही. पादचाऱ्यांना चालताना त्रास होईल याचाही विचार करण्यात आलेला नाही. महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिमेंट रोड समतल असावा
शहरातील नागरिकांची खड्ड्यांच्या त्रासातून सुटका व्हावी या हेतूने शहरात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सिमेंट रोडची कामे उत्तम दर्जाचे होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु छोटा ताजबाग ते भांडेप्लाट चौक सुरू असलेल्या सिमेंट रोडचे काम समतल नाही. यामुळे प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Web Title: Tajbagh Road's car slowed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.