शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

तडफडणाºया तुंबडे काकू अन् संवेदनाहीन समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:41 IST

स्मिता जयंत तुंबडे. मॉर्निंग वॉक ही त्यांची नित्याची सवय. पती मॉर्निंग वॉकवरून परतले की त्या घराबाहेर पडायच्या. बुधवारी प्रतापनगर भागातील मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक सुरू असताना अचानक कुठुन तरी एक भरधाव वाहन आले....

ठळक मुद्देमॉर्निंग वॉक करताना अपघात : गर्दीतील कुणीही नेले नाही इस्पितळात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मिता जयंत तुंबडे. मॉर्निंग वॉक ही त्यांची नित्याची सवय. पती मॉर्निंग वॉकवरून परतले की त्या घराबाहेर पडायच्या. बुधवारी प्रतापनगर भागातील मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक सुरू असताना अचानक कुठुन तरी एक भरधाव वाहन आले आणि काही कळायच्या आतच थेट त्यांच्यावर धडकले. प्राणांतिक वेदनेने तडफडत त्या रस्त्यावर कोसळल्या. लोक जमले, गर्दी वाढत गेली. पण, या गर्दीतल्या एकानेही हाकेच्या अंतरावरील रुग्णालयात त्यांना हलवले नाही. सगळेच्या सगळे मन दगडाचे करून पोलिसांची वाट पाहत बसलेअन् पांढरपेशा समाजाची हीच संवेदनहिनता स्मिता तुंबडे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.नागपूर शहर मेट्रो म्हणून विकसित होत असताना नागरिकांच्या संवेदना मात्र अशा हरवत चालल्या आहेत. तुंबडेकाकूंच्या दुर्र्दैवी निधनाने हीच हळहळ व्यक्त केली जात आहे. स्मिता तुंबडे (५७) या प्रतापनगर चौकातील सप्तक अपार्टमेंटमध्ये राहणाºया गृहिणी. या फ्लॅटमध्ये पती-पत्नी दोघेच राहतात. मुलगा अनिकेत बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे व मुलगी मुंबईला राहते. सकाळी फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. पती जयंत तुंबडे फिरून आल्यानंतर त्या घराबाहेर पडायच्या. सकाळी ५.४५ च्या दरम्यान त्या फिरायला निघाल्या. प्रतापनगर रोडवरील बडजाते हॉस्पिटलजवळ त्यांना अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने त्या रस्त्यावर पडल्या. वाहन चालक पळून गेला. दरम्यान या रोडवर नियमित मॉर्निंग वॉक करणाºयांनी त्यांना पाहिले. यातील कुणीतरी पोलिसांना व १०८ क्रमांकावर फोन केला. त्यांना पाहणाºयांची गर्दी होती. मात्र या गर्दीमध्ये त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यासाठी कुणीही समोर आले नाही. ‘त्या कुठल्या आहेत, आपल्या ओळखीच्या आहेत का, पोलिसांना येऊ द्या’ अशा चर्चा केवळ सुरू होत्या. यादरम्यान ओसीडब्ल्यूचे पीआरओ सचिन द्रवेकर गर्दी पाहून तेथे पोहचले. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली आणि त्यांना जवळच्या डॉ. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पत्रकाराने दाखविली संवेदनारस्त्यावर पडून असलेल्या स्मिता तुंबडे यांना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. साधारणत: १५ मिनिटानंतर या मार्गाने जात असलेले सचिन द्रवेकरही गर्दी पाहून तेथे पोहचले. त्यातील कुणीतरी पोलिसांना फोन केल्याचे सांगत होते. मात्र द्रवेकर यांनी आधी त्यांना रुग्णालयात पोहचविण्याची विनंती केली. आॅटोही थांबविण्याचे प्रयत्न केले. जवळ राहणाºयांना गाडी आणण्याचे आवाहन केले. याच भागात राहणारे ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव गर्दी पाहून तेथे पोहचले. यादरम्यान पोलिसांची गाडी तेथे दाखल झाली. द्रवेकर आणि उपदेव यांनी तुंबडे यांना पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. मात्र आधीच उशीर झाल्याने त्यांचेही प्रयत्न निष्फळ ठरले.