बिर्यानी सेंटरमध्ये ताेडफाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:00+5:302021-01-08T04:24:00+5:30
इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू नागपूर : निर्माणाधीन इमारतीवर काम करीत असताना एका मजुराचा पडून मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव ...

बिर्यानी सेंटरमध्ये ताेडफाेड
इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू
नागपूर : निर्माणाधीन इमारतीवर काम करीत असताना एका मजुराचा पडून मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव बालाघाट निवासी २० वर्षीय दुर्गेश सुरेश ब्रह्मे असे आहे. ताे हुडकेश्वरच्या दत्तात्रयनगर येथे एका इमारतीच्या बांधकामावर हाेता. बुधवारी या इमारतीवरून पडल्याने ताे जखमी झाला हाेता. मेडिकलमध्ये नेल्यावर त्याला मृत घाेषित करण्यात आले. हुडकेश्वर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
पाय घसरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू
नागपूर : घरी पाय घसरून पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. रामबाग काॅलनी निवासी ६८ वर्षीय गाेविंदराव चहांदे असे मृताचे नाव आहे. ४ जानेवारी राेजी घरी पाय घसरून पडल्याने ते जखमी झाले हाेते. त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू हाेता. बुधवारी त्यांचे निधन झाले. इमामवाडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.