मोमीनपुऱ्यात गोळ्या चालल्या

By Admin | Updated: August 3, 2014 01:01 IST2014-08-03T01:01:13+5:302014-08-03T01:01:13+5:30

मोमीनपुरा भागातील अन्सारनगर येथे दोन गुंडातील संघर्षात एकाने दुसऱ्यावर दोन गोळ्या झाडण्याची घटना शुक्र वारी रात्री ११ च्या सुमारास घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे या भागात घबराट पसरली होती.

Tablets were shot in Mominpur | मोमीनपुऱ्यात गोळ्या चालल्या

मोमीनपुऱ्यात गोळ्या चालल्या

दोन गुंडांत संघर्ष : एक गंभीर
नागपूर : मोमीनपुरा भागातील अन्सारनगर येथे दोन गुंडातील संघर्षात एकाने दुसऱ्यावर दोन गोळ्या झाडण्याची घटना शुक्र वारी रात्री ११ च्या सुमारास घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे या भागात घबराट पसरली होती.
अन्सारनगर येथील मोेहम्मद सोहेल उर्फ सोनू काल्या (२२) हा चेन स्नॅचिंग व लुटमारीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. गाडीचा कट मारल्यावरून सोनूचा काही दिवसापूर्वी कुख्यात गुंड वस्सी पठाण याच्याशी वाद झाला होता. तेव्हापासून दोघात धुसफूस सुरू होती. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास सोनूने वस्सीच्या दिशेने कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या. वस्सी व त्याच्या साथीदारांनी यातून स्वत:चा बचाव क रीत सोनूला पकडले. दारूच्या नशेत असल्याने सोनूवर सुऱ्याने वार क रून त्याला गंभीर जखमी केले. आरोपी लगेच पसार झाले.
वस्सी हा गेल्या चार महिन्यांपासून फरार आहे. त्याने पळून जाताना पोलिसांवर गोळीबार केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात आहे. रात्री उशिरा वस्सीच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली.(प्रतिनिधी)

Web Title: Tablets were shot in Mominpur