सिम्बायसिसचे कॅ म्पस नागपुरात
By Admin | Updated: January 6, 2017 02:33 IST2017-01-06T02:33:18+5:302017-01-06T02:33:18+5:30
नागपूर महापालिकेने जमीन सिम्बायसिसला उपलब्ध केली असून या विद्यापीठाच्या कॅम्पसच्या भूमिपूजनाचा समारंभ सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे

सिम्बायसिसचे कॅ म्पस नागपुरात
आज भूमिपूजन : नागपूरच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी
नागपूर : नागपूर महापालिकेने जमीन सिम्बायसिसला उपलब्ध केली असून या विद्यापीठाच्या कॅम्पसच्या भूमिपूजनाचा समारंभ सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शा.ब.मुजूमदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्र वारी सकाळी १० वाजता वाठोडा येथे संपन्न होणार आहे.
नागपूरकरांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. दर्जेदार शिक्षण देणे हा सिम्बायसिसचा ध्यास असून ‘गुणवत्ता’हा श्वास आहे. अशी ग्वाही सिम्बायसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्राचे दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी सिम्बायसिस ही संस्था नागपुरात यावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. सिम्बायसिसच्या संचालक मंडळाने देखील त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला. सिम्बायसिस मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नागपूर व परिसरातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येईल. अशा गुणवान विद्यार्थ्यांच्या शुल्कात १५ टक्के सूट देण्यात येईल. अशी माहिती विद्या येरवडेकर यांनी दिली. कॅम्पसमध्ये व्यवस्थापन, विधी आणि डिझाईन या शाखा सुरू होणार असून बी.बी.ए., एल.एल.बी., फॅशन आणि टेक्सटाईल डिझाईन या विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. तसेच आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, कम्युनिकेशन या क्षेत्रातील कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम, एव्हीएशन, एअरपोर्ट लॉजिस्टिक असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ,सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. रामन, विधी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. शशिकला गुरुपुरे, सिम्बायसिस इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनचे संचालक डॉ. विनय मुंदडा, सिम्बायसिसच्या आरोग्य इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते. (वा. प्र.)