‘स्वाईन फ्लू’ने आणखी एकाचा मृत्यू
By Admin | Updated: January 25, 2015 00:54 IST2015-01-25T00:54:45+5:302015-01-25T00:54:45+5:30
‘स्वाईन फ्लू’ने बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास एका ३५ वर्षीय रुग्णाचा ‘स्वाईन फ्लू’ने उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला.

‘स्वाईन फ्लू’ने आणखी एकाचा मृत्यू
नागपूर : ‘स्वाईन फ्लू’ने बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास एका ३५ वर्षीय रुग्णाचा ‘स्वाईन फ्लू’ने उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, शहरात ज्या खागसी इस्पितळात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्या होत्या त्या फुल्ल झाल्याची माहिती आहे.
संजय जाधव (३५) रा. हजारी पहाड, वायुसेनानगर, असे मृत रुग्णाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय यांना संशयित म्हणून मेडिकलमध्ये भरती केल्यानंतर २० जानेवारीला जाधव यांच्या घशातील द्रव्याचे नमुने घेण्यात आले.
खासगी इस्पितळे फुल्ल
शहरातील मोजक्याच खासगी इस्पितळांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु येथील खाटा फुल्ल झाल्याची माहिती आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खाटा नसल्याने रुग्णांना मेडिकलकडे पाठविण्यात येत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडिकलने स्वाईन फ्लूचा वॉर्ड सज्ज केला आहे. सध्या चार रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.