शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

सणासुदीत साखरेचा गोडवा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:49 IST

यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यात १२ रुपयांची वाढ : किरकोळमध्ये ४२ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारचे धोरणयावर्षी एप्रिल महिन्यात मीलमध्ये २५ रुपये आणि ठोकमध्ये २८ रुपयांत सारखेची विक्री झाली. साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे साखर उद्योग वाचविण्याची मागणी केल्यानंतर सरकारने देऊ केलेल्या प्रोत्साहनपर राशीनंतर साखरेच्या किमती वाढल्या आणि कारखान्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर बाजारात सारखेचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलमध्ये ३० रुपयांचे भाव एक महिन्यातच ३४ ते ३६ रुपयांवर पोहोचले.ठोक साखर विक्रेते रामदास वजानी यांनी सांगितले की, उसाच्या भरघोस उत्पादनामुळे साखरेचे भाव फारच कमी झाले. त्यामुळे साखर कारखान्यांना तोटा झाला. महाराष्ट्रात २० हजार कोटी रुपयांचे चुकारे ऊस उत्पादकांचे थकीत झाले. एकीकडे साखरेचे कमी भाव तर दुसरीकडे उत्पादकांचे कोट्यवधींच्या थकीत रकमेमुळे कारखानदार दुहेरी पेचात सापडले. कारखाने टिकवून ठेवण्याासाठी त्यांनी थेट पंतप्रधान यांच्याकडे मदतीची मागणी केली. शेतकºयांना वाचविण्यासाठी सरकारने काही योजना आणल्या.उत्पादन ३२२ लाख टन तर देशात विक्री २५५ लाख टनसरकारने निर्यात खुली केली आणि आयात शुल्क माफ केले. निर्यातीत प्रति पोत्यावर (१०० किलो) ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी देऊ केली. त्यामुळे कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळाला. पण विदेशातही यावर्षी उसाचे बंपर उत्पादन झाल्यामुळे निर्यात नगण्य होती. त्यानंतरही यावर्षी निर्यात चार लाख टन होण्याची शक्यता आहे. सरकारने मिल मालकांना कोटा बांधून दिला. साखरेचे भाव २९ रुपये निर्धारित केले. त्यामुळे साखरेच्या भावात वाढ होऊ लागली. वजानी यांनी सांगितले की, देशात वार्षिक २५५ लाख टन विक्रीच्या तुलनेत यावर्षी देशात ३२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. एवढी साखर विकायची कुठे, हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला. पुरवठा आणि मागणीत प्रचंड तफावत आल्याने यावर्षी कारखानदारांना मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेInflationमहागाई