श्रद्धेय बाबूजी यांना आज स्वरसुमनांजली
By Admin | Updated: November 25, 2014 00:55 IST2014-11-25T00:55:31+5:302014-11-25T00:55:31+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार, दि. २५ रोजी स्वरसुमनांजली अर्पण करण्यात येईल.

श्रद्धेय बाबूजी यांना आज स्वरसुमनांजली
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार, दि. २५ रोजी स्वरसुमनांजली अर्पण करण्यात येईल.
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होईल. याप्रसंगी गायिका पल्लवी कुंभारे भक्तीगीत सादर करतील. सहगायक म्हणून व संवादिनीवर प्रशांत भिंगारे साथ देतील. तबल्यावर प्रसिद्ध तबलावादक अनुप तायडे राहतील.
तसेच मायनरवर महेश काळे साथ देतील. ध्वनिसंयोजन व्यवस्था अशोक दुरुगकर यांची राहील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)