स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची लोकमतच्या मुद्रण प्रकल्पाला भेट
By Admin | Updated: December 26, 2016 02:45 IST2016-12-26T02:45:53+5:302016-12-26T02:45:53+5:30
स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलच्या ५१ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित

स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची लोकमतच्या मुद्रण प्रकल्पाला भेट
तंत्रज्ञानाचे धडे : स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलच्या ५१ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी लोकमतची प्रति तास ४५ हजार अंकांची छपाई कशी केली जाते याबाबत माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यप्रणाली अगदी जवळून पाहिली. लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची व सौर ऊर्जा प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.