शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

नागपुरात  शिवसेना पदाधिका-याच्या घरासमोर फेकला सुतळी बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:53 IST

शिवसेनेच्या उत्तर नागपुरातील पदाधिकाऱ्याच्या घरावर चार आरोपींनी सुतळी बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना पाचपावलीत सोमवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात सोमवारी दुपारपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांसह अनेक शिवसैनिकांनी पाचपावली ठाण्यात धडक देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धडक : आरोपींना पकडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेच्या उत्तर नागपुरातील पदाधिकाऱ्याच्या घरावर चार आरोपींनी सुतळी बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना पाचपावलीत सोमवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात सोमवारी दुपारपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांसह अनेक शिवसैनिकांनी पाचपावली ठाण्यात धडक देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.पाचपावलीतील वैशालीनगरजवळ मिलिंदनगर आहे. या परिसरात किशोर ठाकरे राहतात. ते शिवसेनेचे त्या भागातील पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे शिकवणी वर्ग चालतात. त्यामुळे ठाकरे यांच्या घरासमोर दिवसभर वर्दळ असते. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास दोन दुचाक्यांवर चार आरोपी आले. त्यांनी सुतळी बॉम्ब ठाकरेंच्या घरासमोर फेकला. जोरदार आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. शिवसेना पदाधिकाºयाच्या घरासमोर बॉम्बस्फोट घडून आल्याची अफवाही पसरली. त्यामुळे परिसरात सोमवारी सायंकाळपासून तणाव निर्माण झाला. ठाकरे यांनी माहिती कळविल्यानंतर पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी बॉम्ब फेकल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकाºयात रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी आपल्या सहकाºयांसह पाचपावली ठाणे गाठले. त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. ठाणेदार हिवरे यांनी आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल,असे आश्वासन दिल्याने रोष निवळला.कुणाला दुखापत नाहीपाचपावली पोलिसांनी या प्रकाराबाबत सोमवारपासून कमालीची गोपनीयता बाळगली. दरम्यान, मंगळवारी दुपारी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याला घेराव केल्याचीही अफवा पसरली. या संंबंधाने पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. मात्र, ठाकरे यांच्यासोबतच्या शत्रुत्वामुळे हा प्रकार घडला की एखाद्या विद्यार्थ्यांच्या आपसी मतभेदातून किंवा प्रेमप्रकरणातून ही घडली, ते सांगता येणार नसल्याचे म्हटले. या घटनेत कुणालाही कोणतीच दुखापत झाली नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हाShiv Senaशिवसेना