शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:59 IST

नंदनवनमधील खरबी चौकाजवळच्या सहकारनगरात राहणारे मधुकर निनावे (वय ६९) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देबेदम मारहाण करून ठार मारल्याचा आरोप : उलटसुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवनमधील खरबी चौकाजवळच्या सहकारनगरात राहणारे मधुकर निनावे (वय ६९) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.सहकारनगर, प्लॉट नं. ७ मध्ये राहणारे मधुकर निनावे रेल्वेच्या वॉकी टाकी विभागात कार्यरत होते. त्यांच्या परिवारात पत्नी सुमन, अरविंद, प्रशांत ही मुले आणि एका विवाहित मुलीचा समावेश आहे. १० वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना मोठी रोख रक्कम मिळाली. त्यावेळी त्यांनी घर, तर मुलांनी महागडी बुलेट आणि एक दुसरी दुचाकी घेतली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दारूचे व्यसन जडल्यामुळे त्यांचा मुलासोबत नेहमी वाद होत होता. होळीच्या दिवशी गुरुवारी रात्री ७ ते ८ च्या सुमारास त्यांच्यात आणि मुलात पुन्हा कडाक्याचा वाद झाला. शेजारच्या अनेकांनी तो बघितला. बाजूच्या काही सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो कैद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पांगापांग झाली. शुक्रवारी धुळवडीचा दिवस असल्याने त्यांना सकाळी उठवण्याचे पत्नीने टाळले. मात्र, दुपारी बराच वेळ होऊनही ते तसेच झोपून दिसल्याने पत्नीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. निनावेंचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पत्नीने मुलगी तसेच अन्य नातेवाईकांना कळविले. शेजारीही गोळा झाले. त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्यामुळे एकाने नंदनवन पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह बघितल्यानंतर पत्नी आणि मुलांसह अन्य नातेवाईकांचीही विचारपूस केली. निनावे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला.पोलीस म्हणतात, चौकशी सुरू आहेया संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चा आहे. निनावे यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आहे तर नंदनवन पोलिसांनी जखमा असल्याचे मान्य केले तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. चौकशी सुरू असून, सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर