शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 10:37 IST

त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सावनेर (नागपूर) : मैत्रिणीसाेबत सावनेर शहरातील सटवा माता मंदिर परिसरात असलेल्या केशव लॉजमध्ये आलेल्या तरुणाचा रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास खाेलीत संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

अजय जंगलू परतेकी (२७, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. अजय त्याच्या बिछवा-खमरापाणी, जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील २३ वर्षीय मैत्रिणीसाेबत दुचाकीने सावनेर शहरातील केशव लाॅजमध्ये आला व खोली क्रमांक-१०२ मध्ये थांबला हाेता. मध्येच त्याची प्रकृती बिघडल्याने मैत्रिणीने लाॅज व्यवस्थापकाला माहिती दिली.

लाॅज मालक अनिल करारे यांनी खाेलीत जाऊन बघितले असता, ताे मृतावस्थेत पडून असल्याचे त्यांना दिसले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. अजयने उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

हृदयविकाराची शक्यता

अजय व त्याची मैत्रीण तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले हाेते. दाेघेही लग्न करणार हाेते. अजयचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्याजवळ काहीही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाही. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण पाेस्टमार्टम रिपाेर्ट प्राप्त झाल्यानंतर कळेल, अशी माहिती सहायक पाेलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी दिली.

दुसरी घटना

सावनेर शहरातील लाॅजमध्ये तरुणाचा मृत्यू हाेण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना हाेय. भूषण काळूराम मुसळे, रा. चिचपुरा, सावनेर या तरुणाने शहरातील संकेत लाॅजमध्ये १७ मे राेजी आत्महत्या केली हाेती. सावनेर शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गालगत हाॅटेल व लाॅजचे माेठे पीक आले आहे. यातील बहुतांश लाॅजमध्ये अनैतिक प्रकार चालत असल्याची माहिती सावनेर शहरातील नागरिकांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर