ठगबाज दिनेश टुलेचे भाजपशी नाते

By Admin | Updated: April 23, 2015 02:40 IST2015-04-23T02:40:09+5:302015-04-23T02:40:09+5:30

कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या तसेच मद्य व्यापाऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या ठगबाज दिनेश टुले याचे भाजपाच्या

Suspicionist Dinesh Tule's BJP relationship | ठगबाज दिनेश टुलेचे भाजपशी नाते

ठगबाज दिनेश टुलेचे भाजपशी नाते

जगदीश जोशी नागपूर
कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या तसेच मद्य व्यापाऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या ठगबाज दिनेश टुले याचे भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. एकेकाळी तुरुंगाची हवा खाऊन आलेला टुले मंगळवारी नागपूर दौऱ्यावर आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत सावलीसारखा फिरत होता. दानवे यांच्यासोबत त्याने भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत ‘भरत मिलाप’देखील केला. या संबंधांमुळे भाजपात खळबळ माजली आहे. २००७ साली दिनेश टुले याने केलेली फसवणूक समोर आली होती. टुले नरखेडमधील भिष्णूर येथील रहिवासी आहे. पहिले तो राज्यातील एका मोठ्या मंत्र्याचा अगदी ‘खास’ होता.
वडिलांनादेखील सोडले नाही
दिनेश टुले याने आपल्या वडिलांचीदेखील फसवणूक केली होती. कौटुंबिक शेतीचा त्याने एका व्यक्तीसोबत परस्पर सौदा केला. याची माहिती मिळताच त्याचे वडील गुणवंत टुले यांनी वाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल केला.
शिक्षादेखील सुनावली
टुलेला मालेगाव येथील न्यायालयाने फसवणुकीच्या एका प्रकरणात एका महिन्याची कैद किंवा २० हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले होते. त्याने न्यायालयात दंड भरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याविरुद्ध जयस्वाल यांच्या आत्महत्येसह इतर प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. टुलेच्या प्रभावामुळे त्याला ‘तारीख पे तारीख’ मिळते आहे

Web Title: Suspicionist Dinesh Tule's BJP relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.