शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बॉम्बच्या संशयात सापडली दारू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:04 IST

बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली.

ठळक मुद्देअपार्टमेंटमध्ये सापडले बेवारस वाहन : अंबाझरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली. 

अमरावती रोडवर हिंदुस्थान कॉलनीमध्ये सुमन कॅथल अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रात्री अज्ञात आरोपी महिंद्रा एक्सयूव्ही क्रमांक एम.एच. ०३/बी.जे./९९७९ पार्क करून फरार झाले. बुधवारी सकाळी अपार्टमेंटच्या चौकीदाराची वाहनावर नजर गेली. त्याने अपार्टमेंटमधील लोकांना वाहनाबाबत विचारणा केली. परंतु सर्वांनीच आपण वाहन पार्क केले नसल्याचे सांगितले. तेव्हा अंबाझरी पोलिसांना सूचना देण्यात आली. अंबाझरी पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. वाहनाच्या काचावर काळ्या रंगाची फिल्म लागलेली होती. वाहनाच्या आत काय आहे, हे पाहण्यासाठी पोलिसांनी वाहन हलविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आवाज येऊ लागला. पोलिसांना यात विस्फोटक किंवा घातक वस्तू असल्याचा संशय आला. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावून घेतले. यानंतर वाहनाची काच तोडण्यात आली. तेव्हा त्यात दारू असल्याचे उघडकीस आले.गाडीमध्ये दारूचे ६० बॉक्स सापडले. यात अहमदनगर येथे निर्मित देशीदारू सापडली. पोलिसांनी दारू व वाहन जप्त केले आहे. दिवसभर वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला. परंतु त्याचा कुठलाही पत्ता लागला नाही. रात्री दारू तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला.अशी शक्यता वर्तविली जात आहे की, जप्त दारू गुपचूपपणे प्रतिबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचविली जात होती. मंगळवारी रात्री शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू होती. त्यामुळे आरोपींनी घाबरून वाहनअपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लपविले. बुधवारी सकाळी वाहन घेऊन जाण्याची त्यांची योजना असावी. परंतु त्यापूर्वीच पोलीस पोहोचले. कारचा नंबर दुसऱ्या शहरातील असल्याने तो बोगस असल्याचा संशय आहे. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार विजय कारे, एएसआय आशिष कोहळे, सचिन बंसोड, विजय गिरी, अंकुश घटी, योगेश काटरपवार, बलजित ठाकूर आणि दिनेश जुमनाके यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाड