शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो रेल्वे कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 08:28 IST

मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाता प्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाता प्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीचा प्रभारी अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे.

नागपूर- मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाता प्रकरणी दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीचा प्रभारी अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे. सुरक्षा सांभाळणाऱ्या प्रभारी अभियंत्याचं निलंबन झालं आहे. मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिलर रविवारी दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातात त्या महिलेची सासूही जखमी झाली. आजीच्या कडेवर असलेली जखमी महिलेची मुलगी सुदैवाने बचावली. सेंट्रल एव्हेन्यूवर रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.  हा अपघात मेट्रोच्या अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप करून नागरिकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती.

लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. अ‍ॅन्थोनी यांनी मेट्रोचे काम करणारे कमलकिशोर सुरेंद्रकुमार शर्मा (वय ४८, रा. सुभाषनगर नजिमाबाद, जि. बीजनौर), सहायक अभियंता निलेश पराते, नरेंद्र कुमार आणि शिशिर सिंग यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. 

अपघात कसा घडला ?हिवरीनगर, भीम चौक नंदनवन येथे राहणा-या अमी जोशी, दीड वर्षीय मिरा नामक मुलगी आणि सासू साधना जोशी यांच्यासह अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ४९/ क्यू ०५३७) गांधीबागकडे जात होत्या. सेंट्रल एव्हेन्यूवरील छापरू नगर-आंबेडकर चौकाजवळच्या हनीशीला अपार्टमेंट समोर अचानक मेट्रोच्या कामासाठी लावलेला एक लोखंडी कॉर्टर पिल्लर जोशी यांच्या दुचाकीवर आदळला. त्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अमी जोशी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मागे बसलेल्या सासू साधना यांनाही मार लागला.सुदैवाने आजीच्या कडेवर असलेल्या चिमुकल्या मिराला मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. या तिघींनाही तातडीने बाजुच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जमाव वाढत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे तणावात मोठी भर पडली. वाहतूक पोलीस आणि लकडगंज पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले.

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघात