शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचा सस्पेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:47 IST

नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे.

ठळक मुद्देचार महिन्यानंतर प्रमोशन : ठाणे आयुक्तांचा पॅटर्न पुणे आणि नागपुरातही चर्चेला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे.१ ऑगस्टपासून राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय रोज वेगवेगळ्या वळणावर येऊन थांबत आहे. तीन दिवसापूर्वी या बदलीच्या अनुषंगाने मुंबईत झालेल्या बैठकीत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तेथेच जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. फणसाळकर यांची चार महिन्यानंतर पदोन्नती होणार असल्याची चर्चा असून त्यामुळेच त्यांना तोपर्यंत ठाण्यातच आयुक्तपदी कायम ठेवण्याचे ठरल्याचे समजते. डिसेंबरमध्ये पोलीस महासंचालक (डीजी) डी. कनकरत्नम निवृत्त होणार, त्यामुळे डीजींची एक जागा रिक्त होईल. त्यासोबतच एडीजी रश्मी शुक्ला, रजनीश सेठ आणि के. व्यंकटेशम हे तीन अधिकारीसुद्धा पदोन्नतीसाठी पात्र ठरतील. हाच मुद्दा आता नागपूर आणि पुणे आयुक्तांसाठीही चर्चेला आला आहे. व्यंकटेशम यांच्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार यांचीही पदोन्नती होणार आहे. त्यामुळे ठाण्यासोबत पुणे, नागपुरातील पोलीस आयुक्तांच्या बदल्या करायच्या की नाही, यावर एकमत व्हायला तयार नसल्याची खास सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी या संबंधाने झालेल्या बैठकीत नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी अतिरिक्त महासंचालक राजेंद्रसिंह यांची नियुक्ती करण्याचे ठरले होते. तत्पूर्वी येथे पोलीस आयुक्त म्हणून प्रभातकुमार आणि सुनील रामानंद यांचीही नावे चर्चेला आली होती. मात्र ही नावे मागे पडली आणि राजेंद्रसिंह यांचे नाव पुढे आले. या पार्श्वभूमीवर, बुधवारी रात्री नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्याचा मेसेज सर्वत्र व्हायरल झाला. तेव्हापासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या संबंधाने संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाº­यांकडे विचारणा केली असता ते यावर भाष्य करण्याचे टाळत आहेत.

राजेंद्रसिंह म्हणतात...ज्यांच्या नावाची चर्चा आहे, ते अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्रसिंह यांना याबाबत विचारणा केली असता आदेश आल्यानंतरच यावर बोलणे योग्य होईल, असे ते म्हणाले.

अजून निश्चित नाही : गृहमंत्रीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मुंबईत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून काहीही निश्चित झाले नाही. अशी माहितीवजा प्रतिक्रिया गुरुवारी लोकमतला दिली. गृहमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे पोलीस आयुक्तपदाच्या बदलीचा विषय आणखीनच सस्पेन्स वाढवणारा ठरला आहे.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयTransferबदली