शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निलंबित शिपायाचा डीसीपीच्या बंगल्यावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 20:09 IST

निलंबित केल्यामुळे दुखावलेल्या एका पोलीस शिपायाने झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गोंधळ घातला. दारू पिऊन असलेल्या या शिपायाने बंगल्यात प्रवेश करून शिविगाळ केली. बंगल्यावर तैनात असलेल्या शिपायालाही शिविगाळ करीत दारूची बाटली फोडून हल्लाही केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने शहर पोलीस विभाग हादरले आहे.

ठळक मुद्देआरोपी शिपायाला अटक : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निलंबित केल्यामुळे दुखावलेल्या एका पोलीस शिपायाने झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गोंधळ घातला. दारू पिऊन असलेल्या या शिपायाने बंगल्यात प्रवेश करून शिविगाळ केली. बंगल्यावर तैनात असलेल्या शिपायालाही शिविगाळ करीत दारूची बाटली फोडून हल्लाही केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने शहर पोलीस विभाग हादरले आहे.प्रदीप चौधरी असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. प्रदीप पूर्वी पोद्दार यांच्या बंगल्यावर तैनात होता. असे सांगितले जाते की, त्याला दारूचे व्यसन आहे. यापूर्वीही त्याचे एका डीसीपीच्या बंगल्यावर तैनाती दरम्यान वाद झाला होता. दीड महिन्यांपूर्वी त्याने पोद्दार यांच्या बंगल्यावर तैनात असताना वाद घातला होता. त्याने काम करण्यास नकार दिला होता. यामुळे त्याला ३० आॅक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून प्रदीप अतिशय दुखावलेला होता.मंगळवारी रात्री ९ वाजता प्रदीप लॉ कॉलेजजवळील पोद्दार यांच्या शासकीय बंगल्यावर आला. त्याने बंगल्यासमोर आपली बाईक उभी केली. दारूची बॉटल घेऊन तो बंगल्यात शिरला. तिथे शिपाई सागर आत्राम हे फोन ड्युटीवर तैनात होते. प्रदीप सागर यांना शिविगाळ करीत धमकावू लागला. त्याने बंगल्यासमोर दारूची बॉटल फोडून सागरला फेकून मारली आणि बाईकवर स्वार होऊन फरार झाला. सागरने या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. निलंबित शिपायाद्वारे डीसीपीच्या बंगल्यात गोंधळ घातल्याने पोलीसही हादरले. झोन पाचच्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने प्रदीपच्या शोधात पाठवण्यात आले. तो वाडीत राहत होता. पोलीस रात्री उशिरा त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा तो सापडला. तो नशेत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्याने तिथेही गोंधळ घातला. पोलिसांनी त्याला कसेतरी शांत कले. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, मारहाण करणे आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस