शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 20:36 IST

महावितरणच्या नागपूर परिमंडळातील मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी दुपारी १२.२८ वाजताच्या दरम्यान रेल्वेस्थानकात मालगाडीने कटून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठळक मुद्देआत्महत्या की अपघात? : मालगाडीखाली कटले

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळातील मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी दुपारी १२.२८ वाजताच्या दरम्यान रेल्वेस्थानकात मालगाडीने कटून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महावितरणने हा अपघात असल्याचा दावा केला आहे. परंतु आत्महत्येची शक्यताही नाकारता येत नाही. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना यामुळे धक्का बसला आहे.

दिलीप घुगल (५३) बऱ्याच काळापासून महावितरणच्या प्रादेशिक संचालक पदाचा पदभार सांभाळत होते. ते आपल्या नातेवाईकाला घेण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर पोहोचले होते, असा दावा महावितरणने केला आहे. दरम्यान त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे ते प्लॅटफार्मवर पडून मालगाडीच्या संपर्कात आले. ही घटना रेल्वेस्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात घुगल प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मुंबई एण्डकडे जाताना स्पष्ट दिसत आहेत. ते प्लॅटफार्मवरून उतरून पार्सल कार्यालय आणि आरआरआय कॅबिनकडे जाताना दिसले. काही दूर अंतरावर जाऊन ते पुन्हा परत आले. दरम्यान ते मालगाडीच्या दोन वॅगनच्या मध्ये गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. यात त्यांचे दोन्ही पाय कटले आहेत. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांच्या तपासात त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान पोलिसांनी काटोल मार्गावरील महावितरणच्या कार्यालयात घुगल यांच्या कक्षाचीही तपासणी केली.दोन वेळा गेले रेल्वेस्थानकावर
घुगल दोन वेळा रेलवेस्थानकावर आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली आहे. ते सुरुवातीला ११ वाजता रेल्वेस्थानकावर आले. काही वेळानंतर ते रेल्वेस्थानकावरून निघाले आणि पुन्हा दुपारी १२ वाजता रेल्वेस्थानकावर आले. त्यांनी आपल्या वाहन चालकाला आपल्या नातेवाईकाला घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यामुळे चालक बाहेरच थांबला. त्यानंतर थोड्या वेळातच ही घटना घडली.

कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू केला प्रवासदिलीप घुगल मूळचे नागपूरचेच आहेत. ते कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावामुळे लोकप्रिय होते. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूरवरून आपला प्रवास सुरू केला. १९९९ मध्ये ते काटोल रोड शाखा कार्यालयातून कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचले. २०११ मध्ये ते थेट भरतीने अधीक्षक अभियंता झाले. २०१६ मध्ये त्यांनी चंद्रपूर परिमंडळात मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारला. मे २०१८ पासून ते नागपूर परिमंडळात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. जानेवारी २०१९ पासून ते प्रभारी प्रादेशिक संचालक म्हणून कार्यभार सांभाळत होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणrailwayरेल्वेDeathमृत्यू