शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

आश्चर्य! नागपुरातील ३०४ शाळांकडे नाही स्वत:ची मैदाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:01 IST

शहरातील शे-दीडशे नाही तर तब्बल ३०४ माध्यमिक शाळांकडे स्वत:च्या मालकीची मैदाने नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती खुद्द जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रावर सादर केली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अव्यवस्थेचा भंडाफोड झाला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : माध्यमिक शाळा संहितेनुसार सुविधा असणे अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील शे-दीडशे नाही तर तब्बल ३०४ माध्यमिक शाळांकडे स्वत:च्या मालकीची मैदाने नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती खुद्द जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रावर सादर केली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अव्यवस्थेचा भंडाफोड झाला आहे.प्रतिज्ञापत्रानुसार शहरात एकूण ३५९ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ७ शाळा बंद पडल्या आहेत. उर्वरित शाळांपैकी ४८ शाळांनी २०१७-२०१८ शैक्षणिक सत्रापासून स्वत:ची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. ३०४ शाळांकडे आताही स्वत:ची मैदाने नाहीत. त्यामुळे त्या शाळांनी २९ जून २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुसऱ्यांची मैदाने भाड्याने घेतली आहेत.यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. ही याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल केली आहे. अ‍ॅड. अनिरुद्ध अनंतकृष्णन हे या प्रकरणात न्यायालय मित्र आहेत. माध्यमिक शाळा संहिता व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. शारीरिक शिक्षण मैदाने असल्याशिवाय दिल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे शाळांनी मैदाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.प्रतिज्ञापत्रावर असमाधान व्यक्तमाध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी वर्तमान परिस्थिती पुढे आणली, पण या माहितीने न्यायालयाचे समाधान झाले नाही. मैदाने असलेल्या व नसलेल्या शाळांची नावे, भाड्याची मैदाने कुठे आहेत, ती मैदाने शाळांपासून किती लांब आहेत इत्यादी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली नसल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, या माहितीसह चार आठवड्यांमध्ये विस्तृत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला.प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध जामीनपात्र वॉरंटन्यायालयाने वारंवार वेळ देऊनही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून प्राथमिक शाळांतील मैदानांची माहिती सादर केलेली नाही. तसेच, ते न्यायालयातदेखील उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना फटकारले व त्यांच्याविरुद्ध १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला. वॉरंटद्वारे त्यांना १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले. 

अशी आहे शाळांची परिस्थिती 

प्रशासन                एकूण शाळा             बंद शाळा             मैदाने आहेत              मैदाने नाहीतजिल्हा परिषद                 १२६                          ०१                          १६                           १०९नगर परिषद                   ०६                            ००                          ००                           ०६महापालिका                   ४२                            ०३                          ०७                           ३२खासगी अनुदानित          ८२                           ०१                           ०९                           ७२खासगी विनाअनुदानित  ९४                            ०२                          १३                            ७९मान्यता नसलेल्या           ०९                           ००                           ०३                            ०६एकूण                           ३५९                        ०७                           ४८                           ३०४

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा