सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार थाटात प्रदान

By Admin | Updated: March 23, 2016 02:46 IST2016-03-23T02:46:48+5:302016-03-23T02:46:48+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक ज्योत्स्ना दर्डा यांच्या

Sur Jyotsna presented the National Music Awards | सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार थाटात प्रदान

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार थाटात प्रदान

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण मंगळवारी नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये करण्यात आले. या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी गायिका अंकिता जोशी यांना पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, गायक के. के., लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा आशु दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा. दुसऱ्या छायाचित्रात बासरीवादक आकाश सतीश यांना पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री फडणवीस.

Web Title: Sur Jyotsna presented the National Music Awards