शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर ज्योत्स्ना’चे सूर २३ मार्चला नागपुरात निनादणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:40 IST

लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे.

ठळक मुद्देपाचवा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रतिभावंत संगीतसाधकांचा होणार सन्मानवहिदा रहमान यांची विशेष मुलाखतअंकित तिवारी यांची संगीतमय श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सोहळ्याचे मुख्य अतिथी असतील. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दरवर्षी हा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिला जातो.देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून मागच्या चार वर्षात या मंचाने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा असा मंच आहे ज्याने अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबत संगीताचे क्षेत्र विस्तारण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मागच्या चार वर्षात या पुरस्काराने अवघ्या देशात स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. यंदाच्या या पाचव्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांची मुलाखत आणि तरुणाईचा लाडका गायक अंकित तिवारी यांची संगीतमय श्रद्धांजली हे विशेष आकर्षण राहणार आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध चित्रपट व संगीत समीक्षक, लेखिका भावना सोमय्या अभिनेत्री वहिदा रहमान यांची ३० मिनिटांची मुलाखत घेणार आहेत. तर अमृता फडणवीस यावेळी गीते सादर करतील. जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचे संगीतमय सादरीकरणही यावेळी होणार आहे.परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत.

हे मान्यवर करतील विजेत्यांची निवडसंगीतकार आणि गायक शंकर महादेवन, संगीत दिग्दर्शक प्रीतम, सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक रुपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास आणि टाईम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर हे मान्यवर पाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत.

टॅग्स :Sur Jyotsna National Music Award 2018सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१८