शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सर्वोच्च न्यायालय : जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:32 IST

कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोगासाठी मोकळा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे२० नोव्हेंबरला पुढील सुनावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोगासाठी मोकळा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी या प्रकरणावर २० नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवर दिलेल्या स्थगितीमुळे आयोगाने नागपूरसह वरील चारही जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची निवडणूक थांबूवन ठेवली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नंदूरबार जिल्हा परिषदेच्या प्रकरणामध्ये मुदत संपल्यानंतर निवडणूक घेणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे या जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी)मधील तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित आहेत. या कलममध्ये इतर मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. ही तरतूद राज्यघटनेतील २४३-डी, २४३-टी व १४ व्या आर्टिकलचे आणि ‘के. कृष्णमूर्ती व इतर वि. केंद्र सरकार व इतर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात स्थगनादेश दिला होता. दरम्यान, राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती करून इतर मागासवर्गाला लोकसंख्येनुसार आरक्षण देण्याच्या तरतुदीचा समावेश केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गाच्या लोकसंख्येची माहिती मागितली आहे. ती माहिती राज्य सरकारने सादर केलेली नाही. परिणामी, राज्य निवडणूक आयोगाने थांबून राहून नये. त्यांनी निवडणूक घेण्यासाठी कार्यवाही सुरू ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक