पल्लवी जोशीच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

By Admin | Updated: July 23, 2014 00:51 IST2014-07-23T00:51:25+5:302014-07-23T00:51:25+5:30

अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घालणाऱ्या श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी व पल्लवी जोशी यांच्यासह एजन्टला पोलिसांनी अटक केली होती. यापैकी पल्लवी जोशीची

Supreme Court to challenge Pallavi Joshi's bail | पल्लवी जोशीच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

पल्लवी जोशीच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

श्रीसूर्या फसवणूक प्रकरण : पोलिसांचा निर्णय
अमरावती : अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घालणाऱ्या श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी व पल्लवी जोशी यांच्यासह एजन्टला पोलिसांनी अटक केली होती. यापैकी पल्लवी जोशीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामिनावर सुटका केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशाला पोलीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी, पल्लवी जोशी यांच्यासह एजन्ट्सविरुद्ध नागपूर, अमरावती, अकोला, पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी पल्लवी जोशी यांची उच्च न्यायालयाने २३ जून रोजी जामिनावर सुटका केली. परंतु पोलिसांना उच्च न्यायालयाचा हा निर्णय अमान्य आहे. त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयाच्या शासकीय अभियोक्तांचे मत व विधी आणि न्यायविभाग सहसचिव नागपूर यांच्या परवानगीने उच्च न्यायालयाच्या आदेशांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ही याचिका लवकरच दाखल करण्यात येईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Supreme Court to challenge Pallavi Joshi's bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.