शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या एसटीला ब्रेक व्हॅनचा आधार : नागपूर विभागात पहिली व्हॅन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:26 IST

प्रवासात अनेकदा एसटीची बस बंद पडते. प्रवासी खाली उतरून बसला धक्का मारत असल्याचे दृष्य आपण नेहमीच पाहतो. परंतु यापुढे असे दृष्य पाहावयास मिळणार नाही. एसटीच्या नागपूर विभागात ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ (दुरुस्ती पथक) दाखल झाली आहे. या गाडीत बस दुरुस्त करण्यासाठी अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. बंद पडलेल्या एसटी बसची माहिती मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन ही व्हॅन त्या बसची दुरुस्ती करणार आहे.

ठळक मुद्देमॅसेज मिळताच पोहोचेल नादुरुस्त बसजवळ

दयानंद पाईकराव/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासात अनेकदा एसटीची बस बंद पडते. प्रवासी खाली उतरून बसला धक्का मारत असल्याचे दृष्य आपण नेहमीच पाहतो. परंतु यापुढे असे दृष्य पाहावयास मिळणार नाही. एसटीच्यानागपूर विभागात ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ (दुरुस्ती पथक) दाखल झाली आहे. या गाडीत बस दुरुस्त करण्यासाठी अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. बंद पडलेल्या एसटी बसची माहिती मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन ही व्हॅन त्या बसची दुरुस्ती करणार आहे.अनेकदा मार्गात एसटीची बस पंक्चर झाल्यानंतर, तांत्रिक बिघाड झाला की बंद पडते. अशा वेळी तातडीने दुसऱ्या गावाला पोहोचायचे असल्यामुळे गाडीतील प्रवासी चालक-वाहकांवर आपला रोष व्यक्त करतात. चालक-वाहकांचा यात काही दोष नसताना त्यांनाही प्रवाशांचे बोलणे ऐकावे लागते. त्यानंतर संबंधित चालक-वाहक याची सूचना डेपोला देत होते. डेपोतून दुसरी बस पाठविल्यानंतर संबंधित बसची दुरुस्ती करण्यात येत होती. तर संबंधित बसमधील प्रवाशांची व्यवस्था दुसऱ्या बसमध्ये करून त्यांना रवाना करण्यात येत होते. परंतु बंद पडलेल्या बसची दुरुस्ती करण्यासाठी साहित्याची जुळवाजुळव करण्यात बराच वेळ खर्ची होत होता. यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बंद पडलेल्या बसची तातडीने दुरुस्ती होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांनी दिली. सध्या गणेशपेठ आगारात ही व्हॅन ठेवण्यात आली असून शहरातील इमामवाडा, घाट रोड, मोरभवन आणि वर्धमाननगरमधील बंद पडलेल्या बसला ही व्हॅन सुविधा पुरविणार आहे.काय राहील व्हॅनमध्ये ?एखादी बस पंक्चर झाल्यास ब्रेक डाऊन व्हॅनमध्ये पंक्चर काढण्याचे सर्व साहित्य, हवा भरण्यासाठी कॉम्प्रेसर राहील. याशिवाय एसटी बसचे सर्व स्पेअर पार्ट, ग्रीस मशिन, मेकॅनिकल टुल्सचा समावेश राहणार आहे. याशिवाय बंद पडलेल्या बसची दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा ‘ब्रेक डाऊन व्हॅन’मध्ये समावेश राहणार आहे.सर्वच आगारात होणार उपलब्ध‘ब्रेक डाऊन व्हॅन’ टप्प्याटप्याने नागपूर विभागातील सर्वच आगारात उपलब्ध होणार आहे. यामुळे नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार असून वेळेची मोठी बचत होईल.’अशोक वरठे, विभाग नियंत्रक,नागपूर

टॅग्स :state transportएसटीnagpurनागपूर