जिल्ह्याला ३,७०२ रेमडेसिवीरचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST2021-04-11T04:09:00+5:302021-04-11T04:09:00+5:30
नागपूर : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. नातेवाइकांची भटकंती सुरू झाली ...

जिल्ह्याला ३,७०२ रेमडेसिवीरचा पुरवठा
नागपूर : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. नातेवाइकांची भटकंती सुरू झाली होती. दोन आठवड्यांपासून हा औषधांचा तुटवडा जाणवल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांची औषधासाठी सकाळपासूनच मेडिकल स्टोअर्समध्ये विचारणा होत होती. रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे औषध विक्रेत्यांपुढेसुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या. शनिवारी सायंकाळी जिल्ह्याला रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा झाला. नागपूर शहरातील १०४ रुग्णालयांना २,७६९ औषधांच्या किटचे वाटप करण्यात आले, तर नागपूर ग्रामीणमध्ये २६ रुग्णालयांना ९३३ किट वाटण्यात आले.
हिंगण्यातील शालिनीताई मेघे हॉस्पिटलला २०० किट औषधांचा पुरवठा झाला. जिल्हा प्रशासनाने पुरवठ्याच्या संदर्भातील यादी सायंकाळी रुग्णालयनिहाय प्रसिद्ध केली. औषधांच्या या पुरवठ्यामुळे रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे.