उपराजधानीत क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम

By Admin | Updated: July 13, 2015 02:37 IST2015-07-13T02:37:29+5:302015-07-13T02:37:29+5:30

उपराजधानीतील सर्व पोलीस ठाण्यात १४ जुलैनंतर क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) नुसार कामकाज केले जाईल,

Supervised Crime Control Tracking Network System | उपराजधानीत क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम

उपराजधानीत क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम

राज्यात सर्वप्रथम नागपुरात अंंमलबजावणी : सीपींची माहिती
नागपूर : उपराजधानीतील सर्व पोलीस ठाण्यात १४ जुलैनंतर क्राईम कंट्रोल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) नुसार कामकाज केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सीसीटीएनएसच्या अंमलबजावणीचा मान राज्यात सर्वप्रथम नागपूर पोलिसांना मिळणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.
देशातील सर्व पोलीस ठाणी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये आॅनलाईन पद्धतीने संलग्नित व्हावी, यासाठी केंद्र शासनाने सीसीटीएनएसचा उपक्रम तीन वर्षांपूर्वी सुरू केला. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली.
अनेक शहरात आणि अनेक राज्यात प्राथमिक टप्पा पूर्ण व्हायचा असताना नागपुरात या प्रणालीची पूर्तता झाली असून, १३ जुलैला १२ आणि १४ जुलैला ११ पोलीस ठाण्यात ही प्रणाली सुरू होईल, असे यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

काय आहे फायदे
देशात एकूण किती गुन्हेगार आहेत, फरार किती आहेत, किती बेपत्ता आहेत, किती अनोळखी मृतदेह सापडले, त्याची एकत्रित माहिती सर्वांना पोलीस ठाण्यात बसून बघायला मिळेल. गुन्हेगारांची तातडीने ओळख पटविण्यातही पोलिसांना सोयीचे होईल.
घरबसल्या मागा परवानगी
या प्रणालीतून १११ प्रकारच्या परवानगीचे अर्ज आहेत. त्यामुळे कुणाला कोणती परवानगी पाहिजे, त्यासाठी पोलीस ठाणी किंवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहाणार नाही. घरबसल्या अर्ज डाउनलोड करून परवानगी मिळवता येईल.
टाळाटाळ होणार नाही
आॅनलाईन तक्रार करता येणार असल्यामुळे तासन्तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याच्या तसेच तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ गैरप्रकाराला आळा बसेल. आम्हाला तक्रारच मिळाली नाही, असे कोणताच पोलीस बोलू शकणार नाही.
साडेतीन हजार प्रशिक्षित
या प्रणालीचे प्रशिक्षण आणि मेंटेनन्स विप्रो तसेच बीएसएनएल यांच्याकडे आहे. प्रणालीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी ३५०० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा यामागे उद्देश आहे. सुरुवातील तांत्रिक बाबींमुळे अडचणी येऊ शकतात. मात्र, नंतर सर्व सुरळीत होईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि सर्व उपायुक्त हजर होते.

Web Title: Supervised Crime Control Tracking Network System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.