शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : महिना होऊनही २० लाखाचे यंत्र डब्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:21 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ लाख ८० हजाराचे ११ पेसमेकर तर ११ लाख ९० हजाराचे पोर्टेबल व्हेंटिलेटर येऊन एक महिना झाला आहे. परंतु हे यंत्र डब्यातच बंद आहे. धक्कादायक म्हणजे, या यंत्राचा निधी मेडिकलच्या खात्यात जमा न होताच पुरवठादाराने यंत्र पाठविली आहेत. यामुळे यंत्र ताब्यात घ्यावे किंवा नाही या अडचणीत रुग्णालय प्रशासन सापडले आहे. या संदर्भात प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) कळविले आहे, परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नसल्याचे समजते.

ठळक मुद्दे६ व्हेंटिलेटर, ११ पेसमेकर : डीएमईआर कधी देणार लक्ष?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ लाख ८० हजाराचे ११ पेसमेकर तर ११ लाख ९० हजाराचे पोर्टेबल व्हेंटिलेटर येऊन एक महिना झाला आहे. परंतु हे यंत्र डब्यातच बंद आहे. धक्कादायक म्हणजे, या यंत्राचा निधी मेडिकलच्या खात्यात जमा न होताच पुरवठादाराने यंत्र पाठविली आहेत. यामुळे यंत्र ताब्यात घ्यावे किंवा नाही या अडचणीत रुग्णालय प्रशासन सापडले आहे. या संदर्भात प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) कळविले आहे, परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नसल्याचे समजते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सध्याच्या स्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोसर्जरी व एन्डोक्रेनोलॉजी या आठ विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. यात आणखी नव्या विभागाची भर पडावी व रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत या निधीतून ५० कोटींचे बांधकाम, २५ कोटींचे यंत्र व २५ कोटी मनुष्यबळावर खर्च करण्याचा सूचना आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी रुपये दरवर्षी खर्च करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही आहेत. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने २०१७-१८ साठी आवश्यक यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाकडे पाठविला. नियमानुसार पहिल्या टप्प्यातील २० कोटींचा निधी रुग्णालयाच्या तिजोरीत जमा व्हायला हवा होता, नंतर यंत्रसामुग्री खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकीन महामंडळाच्या खात्यात हा निधी वळता केला जाणर होता. परंतु निधी न मिळता प्रस्तावित यादीतील यंत्र यायला सुरुवात झाली. यात २० लाखाचे सहा पोर्टेबल व्हेंटिलेटर व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ११ पेसमेकर आहेत. ‘एमआरआय’ व ‘डिजिटल रेडिओग्राफी’ यंत्रही लवकरच उपलब्ध होणार आहे. जे यंत्र उपलब्ध झाले ते स्थापन करण्याचा संबंधित कंपनीने तगादा लावणे सुरू केले आहे. परंतु निधीच मिळाला नसताना यंत्र कसे स्थापन करणार, या अडचणीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सापडले आहे. सूत्रानूसार, याबाबत ‘डीएमईआर’ ला कळविले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतेच उत्तर नाही. परिणामी, यंत्राचा लाभ रुग्णांना न मिळताच डब्यातच बंद आहेत.‘सुपर’च्या श्वसनरोग विभागात ५० टक्के रुग्ण हे लंग कॅन्सरचे तर इतर रुग्ण हे श्वसनविकाराशी संबंधित असतात. यांना व्हेंटिलेटरची गरज असते. विभागाने याची मागणी लावून धरल्याने हे यंत्र प्रस्तावित होते. परंतु आता व्हेंटिलेटर आले असताना रुग्ण या यंत्राच्या लाभापासून वंचित आहे, असेच धक्कादायक चित्र हृदय रोग विभागातील आहे. निर्णय घेण्यास एवढा उशीर का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर