शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

विमानांचा उन्हाळी नजराणा; नागपूरहून घ्या कोल्हापूरला झेप, जयपूर, नोएडा अन् इंदूरसाठीही सेवा

By नरेश डोंगरे | Updated: March 1, 2025 23:40 IST

Nagpur News: नागपूर-विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - नागपूर-विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे. होय, आता येथून थेट कोल्हापूर, जयपूरसह ठिकठिकाणी झेपावता येणार आहे. १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीला दिल्लीत स्लॉट समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीला डीजीसीए, एएआय स्लॉट्स, एरोड्रोम ऑपरेटर आणि विविध विमान कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर विमानतळावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्या बैठकीत विमानांच्या उन्हाळी वेळापत्रकाच्या स्लॉटवर चर्चा करण्यात आली आणि अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता नागपूर ते कोल्हापूर, नागपूर ते जयपूर, नोएडा आणि नवीन स्थळांवर थेट विमाने झेपावणार आहेत. इंडिगो आणि स्टार एअर या उपरोक्त स्थानांसाठी खालीलप्रमाणे दररोज उड्डाणे चालविणार आहेत.

अशा राहतील विमानांच्या वेळा १) ३० मार्च २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत रोज सकाळी ७.२० वाजता इंडिगो फ्लाइट ६४१६ जयपूर येथून रात्री ११;०५ वाजता नागपूर विमानतळावर पोहचेल आणि येथून इंडिगो फ्लाइट ६४११ जयपूरला रवाना होईल.२) १ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत रोज दुपारी ३.४५ वाजता स्टार एअर फ्लाइट २५० कोल्हापूरहून नागपुरात पोहचेल आणि येथून रोज दुपारी ४;१५ वाजता कोल्हापूरकडे स्टार एअर फ्लाइट २५१ निघेल.३) ३० एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५पर्यंत नोएडा येथून निघालेले इंडिगो फ्लाइट २५१८ नागपूरला दुपारी ४ वाजता पोहोचेल आणि इंडिगो फ्लाइट २५१९ रोज दुपारी ४;३० वाजता नागपूरहून नोएडासाठी उडेल. याव्यतिरिक्त खालील अतिरिक्त उड्डाणे रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ठिकठिकाणी झेपावण्यासाठी सज्ज राहिल.२६ जुलै ते २५ ऑक्टोबरपर्यंत इंडिगो फ्लाइट ७३३६ इंदूरहून दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल आणि इंडिगो फ्लाइट ७३३७ नागपूरहून दुपारी १२.३५ वाजता इंदूरसाठी रवाना होईल.३० जुलै ते २२ ऑक्टोबरपर्यंत दर बुधवारी इंडिगो फ्लाइट ६१३९ कोलकाता येथून १२;१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि इंडिगो फ्लाइट २३८० १२;४५ वाजता दिल्लीसाठी रवाना होईल.१ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत रोज दुपारी १;०५ वाजता स्टार एअर फ्लाइट २४५५ पुण्याहून नागपूरला पोहोचेल आणि स्टार एअर फ्लाइट २४६ किशनगड साठी रवाना होईल.१ एप्रिल ते २५ ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी २;२० वाजता इंडिगो फ्लाइट ६४५५ बेंगळुरूहून नागपूरात पोहोचेल आणि दुपारी २;५५ वाजता इंडिगो फ्लाइट ६४५६ बेंगळुरूसाठी निघेल.१ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शनिवार वगळता रोज दुपारी ३.१० वाजता इंडिगो फ्लाइट २४८१ पुण्याहून नागपूरला पोहोचेल आणि येथून दुपारी ३.४५ वाजता इंडिगो फ्लाइट २०२ पुण्यासाठी प्रस्थान करेल.

टॅग्स :airplaneविमानnagpurनागपूरAirportविमानतळ