शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

गोरेवाड्यातील 'सुलतान'ची मंगळवारी बोरिवली पार्कमध्ये रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:42 PM

गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद्यानाच्या व्यवस्थापनाला होता.

ठळक मुद्देप्रजनन कार्यासाठी मागणी : वर्षभरापासून सुरू होता पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद्यानाच्या व्यवस्थापनाला होता. मागील वर्षभरापासून यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. त्यानुसार कायदेशिर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने मंगळवारी हा सुलतान नावाचा वाघ तिकडे पाठविला जाणार आहे.बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये ब्रम्हपुरी येथून पकडून आणलेला ‘सुलतान’ नावाचा वाघ असल्याची आणि एक कमी वयाचा वाघ असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे बोरीवली प्रशासनाने ब्रीडिंग कार्यासाठी हा वाघ मिळावा अशी विनंती गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्राकडे केली होती. वन विकास महामंडळा अंतर्गत येणाऱ्या गोरेवाडा अंतर राज्यीय प्राणीसंग्रहालय प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव वरिष्ठांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. यानंतर एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी ब्रीडिंग कार्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ‘सुलतान’ला बोरीवलीमध्ये पाठविण्यासाठी मंजुरी दिली.बोरिवली येथून से रविवारी आरएफओ विजय बारब्दे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेष पेठे, वैभव पाटील, संजय गायकवाड आदींचे पथक सर्वसुविधायुक्त अँबुलन्स घेऊन नागपूरकडे निघाले आहेत. सुलतानच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मंगळवारी बोरिवली पथकाकडे सोपविले जाईल.काळे म्हणाले, ‘त्यांनाच विचारा !’गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक (डीएफओ) नंदकिशोर काळे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, ‘त्यांनाच विचारा. मी काही सांगू शकत नाही.’ असे त्रोटक उत्तर देऊन फोन बंद केला. यामुळे यात लपविण्यासारखे आहे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापनाकडून ब्रीडिंग कार्यासाठी या वाघाची मागणी झाली होती. तशी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार हा वाघ त्यांना सोपविला जात आहे.डॉ. एन. रामबाबूप्रभारी वन बल प्रमुख तथा व्यवस्थापकीय संचालक, वन विकास महामंडळ 

टॅग्स :TigerवाघGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय