शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 19:00 IST

बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील काटोल येथील घटनाबटईने केलेली शेती गारपिटीने उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली.दिलीप मंठूजी लोही (५२, रा. लक्ष्मीनगर, काटोल) असे मृताचे नाव आहे. दिलीप लोही हे मूळचे कोहळी (ता. कळमेश्वर) येथील रहिवासी असून, त्यांची सासूरवाडी लाडगाव (ता. काटोल) असल्याने ते कुटुंबीयांसह काटोल येथे राहायला आले. त्यांनी काही दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम केले. कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांनी आॅटो खरेदी केला होता. आॅटो चालवून ते उपजीविका करायचे. शिवाय, ते ठेका किंवा बटईने शेती करायचे. यावर्षी त्यांनी जितेंद्र वंजारी यांची शेती बटईने केली होती. त्यांनी चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र, संपूर्ण कपाशी बोंडअळीने फस्त केली. शिवाय, गहू व हरभरा गारपिटीने उद्ध्वस्त झाला.पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्यता मावळल्याने ते चिंतेत होते. ते रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर पडले. मात्र, रात्रभर घरी परतले नव्हते. सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भाजपचे विजय महाजन उपोषण मंडपात आले. त्यांनी दिलीप लोही हे मंडपाच्या मागच्या बाजूला पडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शेजारी मोटो नामक कीटकशानकाची बाटली पडली होती. त्यांनी लोही यांचे नातेवाईक विनायक मानकर व ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांना कळविले. शिवाय, लगेच स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यापश्चात पत्नी व मुलगा आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर