कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

By Admin | Updated: August 10, 2014 01:25 IST2014-08-10T00:21:34+5:302014-08-10T01:25:04+5:30

तालुक्यातील टाकळेश्‍वर येथील एका २१ वर्षीय युवा शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केली.

Suicides of Debtor Farmer | कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

संग्रामपूर : तालुक्यातील टाकळेश्‍वर येथील एका २१ वर्षीय युवा शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज शनिवारी सायंकाळी ६.३0 वाजता उघडकीस आली. टाकळेश्‍वर येथील रोशन विजय राहाणे या शेतकर्‍याकडे बँकेची रक्कम थकीत आहे. गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे तसेच अस्मानी संकटामुळे तो कर्जाची परतफेड करु शकला नाही. दिवसेंदिवस कर्जाची रक्कम वाढत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाल्या. त्यामुळे या शेतकर्‍याने आज सायंकाळी आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Suicides of Debtor Farmer