नवेगाव येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:41+5:302021-07-19T04:07:41+5:30
कुही : सततच्या आर्थिक अडचणीला कंटाळून विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मांढळनजीकच्या ...

नवेगाव येथे तरुणाची आत्महत्या
कुही : सततच्या आर्थिक अडचणीला कंटाळून विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मांढळनजीकच्या नवेगाव (देवी) येथे शनिवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गणेश साेमा बाेंद्रे (२२, रा. नवेगाव (देवी), ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव असून, तो मजुरीचे काम करायचा. दाेन वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचा अपघात झाला. या अपघातातून ते बरे झाले नसून, काेमात आहेत. वडिलांच्या आजारपणाचा खर्च तसेच काैटुंबिक उदरनिर्वाहासाठी आर्थिक अडचण भासत असल्याने गणेश तणावात हाेता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी पाेलिसांना दिली. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने काेणते तरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथे पाठविला. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.