माेवाड येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:58+5:302021-07-07T04:09:58+5:30
मोवाड : येथील जुनी वस्ती मंदिर परिसरातील नदीकाठावर एका झाडाला गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.४) ...

माेवाड येथे तरुणाची आत्महत्या
मोवाड : येथील जुनी वस्ती मंदिर परिसरातील नदीकाठावर एका झाडाला गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, साेमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नितीन उत्तमराव बाेबडे (३०, रा. वाॅर्ड नं. ६, माेवाड, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत नितीन हा काही महिन्यापूर्वी नागपूर येथे एका कंपनीत कामाला हाेता. काेराेना काळात लाॅकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसायही केला हाेता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जुनी वस्ती मंदिर परिसरातील नदीकाठावर एका झाडाला गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच माेवाड चाैकी पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नितीनच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण आहेत.
याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पाेलीस हवालदार साहेबराव मसराम, नीलेश खरडे करीत आहेत.