राेजगार गमावलेल्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST2021-05-26T04:09:25+5:302021-05-26T04:09:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : काेराेनामुळे राेजगार गमावला. मजुरीही मिळत नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती ढासळली. यामुळे हताश झालेल्या विवाहित ...

Suicide of a young man who lost his job | राेजगार गमावलेल्या तरुणाची आत्महत्या

राेजगार गमावलेल्या तरुणाची आत्महत्या

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : काेराेनामुळे राेजगार गमावला. मजुरीही मिळत नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती ढासळली. यामुळे हताश झालेल्या विवाहित तरुणाने कन्हान नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे मंगळवारी (दि. २५) उघडकीस आली.

राजू राहुल डाेंगरे (वय ३१, रा. खैरी ढालगाव, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजूने कर्ज घेऊन प्रवासी ऑटाे खरेदी केला हाेता. खैरी ढालगाव ते सावनेर मार्गावर ऑटाे चालवून ताे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत हाेता. अशात काेराेनामुळे प्रवासी वाहतूक बंद झाली. काही दिवस त्याने ट्रॅक्टरचालक म्हणून राेजमजुरी केली. मात्र काही दिवसांत तीही मिळणे बंद झाले. हातांना काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणी जाणवायला सुरुवात झाली. त्यातच आजारपणामुळे पत्नी माहेरी निघून गेली. दिवसेंदिवस आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने ताे तणावग्रस्त हाेता. अशात पत्नीची प्रकृती अधिक खराब झाल्याने तिच्या उपचारार्थ तसेच कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी पैसे आणायचे कुठून, या विवंचनेमुळे ताे अगतिक झाला हाेता. यामुळे हताश झालेल्या राजूने खैरी ढालगावनजीकच्या कन्हान नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या अशा अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.

Web Title: Suicide of a young man who lost his job